Pune : नारायणगाव परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत तोंड अडकल्याने बिबट्या मादीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नारायणगाव परिसरातील धनगरवाडीतील एका संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बिबट्याचे मुंडके अडकल्याने त्याचा प्राण गेला आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. पाण्यामुळे भटकत आलेला बिबट्या त्या विहिरीत पडला मात्र त्या विहिरीत प्लाष्टिक पिशवी होती. त्यामध्ये सरळ तो जाऊन अडकला. पिशवीत त्याचं तोंड गुदमरल्याने त्याचा जीव गेला आहे. असे शवविच्छेदनामध्ये समजलं.

अधिक माहिती अशी, बिबट्या मादी विहिरीत पडल्यानंतर ती आपला प्राण वाचवण्यासाठी त्या मोठ्या प्लाष्टिक पिशवीत गेली. आणि तेथे अडकली. त्यानंतर कदाचित पिशवीमध्ये तोंड अडकल्याने त्या मादीला श्वास घेता येईना. परत त्या पिशवीत पाणी जाऊन तीच तोंड त्यामध्ये गुदमरलं गेलं. त्यामुळे ती मृत्यू पावली. तेथील गावकरी रमेश शेळके यांनी विहिरीवर गेले तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला, त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांंनी पिशवीसह बिबट्या मादीला विहिरीच्या बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात त्या बिबट्या मादीचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समजले.

या दरम्यान, तेथील वनपाल मनीषा काळे म्हणाल्या, खताला वापरतात ती गोणी विहिरीत पडलेली होती. त्यात बिबट गेली असणार आणि त्यात गेल्यावर श्वास घेण्यासाठी झटापट करावी लागली असेल. त्यातच गोणीत पाणी शिरून बिबटला श्वास घेता आला नसेल. परिणामी तिचा गोणीतच मृत्यू झाला. दरम्यान, उन्हाळा असल्याने अनेक वन्यजीवांना पाण्यासाठी भटकत राहावे लागते. गावच्या ठिकाणी अनेक विहिरींना संरक्षक कठडे नाहीत. यामुळे वन्यजीव त्यात पडून जखमी होतात अथवा त्यांचा जीव सुद्धा जातो. यामुळे विहिरींना कठडे लावणे महत्वाचे आहे. तसेच, वन विभागानेही पाणलठ्यांची सोय सुविधा करायला पाहिजे अशी मागणी देखील वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.