LIC ने 8 कंपन्यांमधील आपली पूर्ण भागीदारी विकली ! HDFC Bank सह ‘या’ 5 कंपन्यांमधील सुद्धा कमी केले ‘स्टेक’

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21 च्या अंतिम तिमाहीत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी ( LIC ) म्हणजेच लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ने अनेक कंपन्यांमधील आपली भागीदारी कमी केली आहे, ज्यामध्ये एचडीएफसी बँक सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. परंतु चौथ्या तिमाहीत एलआयसीने ( LIC ) ज्या 10 कंपन्यांमध्ये आपली भागीदारी सर्वात जास्त कमी केली आहे, त्यापैकी 8 कंपन्यांमध्ये एलआयसीने ( LIC ) आपले स्टेक झीरो केले आहेत. म्हणजे 8 कंपन्यांमधील एलआयसीने ( LIC ) आपली भागीदारी विकली आहे.

मार्च तिमाहीच्या दरम्यान शेयर बाजारात जबरदस्त तेजी दिसत होती आणि सेन्सेक्ससह निफ्टी आपल्या ऑल-टाइम हाय वर पोहचला होता. या दरम्यान निफ्टीमध्ये 5% पेक्षा जास्त उसळली आली. ही तेजी पाहता एलआयसीने भरपूर प्रॉफिट बुकिंग केले आणि स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड एकुण कंपन्यांमधील आपली भागीदारी कमी करून 3.66% केली, जी आतापर्यंत सर्वात लो लेव्हल आहे. प्राईम डेटाबेसच्या द्वारे जमवलेल्या आकड्यांनुसार, डिसेंबर तिमाहीपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेट कंपन्यांमध्ये एलआयसीची भागीदारी 3.7% होती, तर मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ती 3.88% आणि जून 2012 मध्ये ती आपल्या रकॉर्ड हाय 5% वर होती. एलआयसीच्या शेयरहोल्डिंगमध्ये केवळ त्या कंपन्यांना सहभागी करण्यात आले आहे ज्यांच्यात तिची भागीदारी 1% पेक्षा जास्त आहे.

या कंपन्यांमधील विकली पूर्ण भागीदारी
एलआयसीने चौथ्या तिमाहीत ज्या 8 कंपन्यांमधील आपली पूर्ण भागीदारी विकली आहे, त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. या बँकेतील एलआयसीने आपली 4.20% भागीदारी विकली आहे. तर एलआयसीने हिंदूस्थान मोटर्समधील आपले 3.56% शेयर, युनियन बँक ऑफ इंडियामधील 3.22% शेयर विकले. तर, ज्योती स्ट्रक्चर्समधील 1.94%, मोरपॅन लॅबोरॅटरीजमधील 1.69% शेयर, आरपीएसजी व्हेंचरमधील 1.66%, इन्सेक्टीसाईड्स इंडियामधील 1.50% आणि दालमिया भारती शुगर कंपनीतील आपले 1.50% शेयर विकले आहेत, या कंपन्यांमध्ये आता एलआयसीची कोणतीही भागीदारी नाही.

या कंपन्यांमध्ये कमी केली सर्वात जास्त भागीदारी
एलआयसीने ज्या कंपन्यांमधील सर्वात जास्त भागीदारी कमी केली आहे, त्यामध्ये एचडीएफसीचा समावेश आहे. एलआयसीने एचडीएफसी बँकेचे 2095.57 कोटी रुपयांचे शेयर्स विकले आहेत. यासोबतच मारूती सुझुकीचे 1,181.27 कोटी रुपयांचे शेयर, युनियन बँक ऑफ इंडियाचे 651.25 कोटी रुपयांचे शेयर, कोटक महिंद्रा बँकेचे 542.66 कोटी रुपयांचे शेयर आणि एशियन पेंट्समधील 463.08 कोटी रुपयांचे शेयर विकले आहेत.

 

Also Read This : 

 

Prakash Ambedkar : ‘मी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जायला तयार; मात्र ते मला BJP कडे ढकलतात’

 

झोपताना देखील लावू शकता ‘हे’ सोपे फेस पॅक..

 

कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला हा जिल्हा, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ‘कठोर’ पावले

 

तुमच्या ‘या’ 10 चांगल्या सवयीमुळं चाळीशी नंतर देखील स्किन राहील ‘जवान’, जाणून घ्या

 

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची मदत करणार मोदी सरकार, PM केयर्समधून दिला जाईल मासिक भत्ता आणि 10 लाख रुपये

 

किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या