Prakash Ambedkar : ‘मी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जायला तयार; मात्र ते मला BJP कडे ढकलतात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मी तर राजकारणातला अस्पृश्य आहे. मी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर जायला तयार आहे. मात्र ते मला भाजपाकडे ढकलतात. पण मी जायला तयार नाही. मी संभाजी राजेंबरोबर जाण्यास तयार असल्याचे मतवंचित विकास बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  Prakash Ambedkar यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता संभाजी राजे आणि अ‍ॅड. आंबेडकर एकत्र येणार का यावर चर्चा सुरु झाली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी (दि. 29) प्रकाश आंबेडकरांची Prakash Ambedkar भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांच्याबरोबर जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहु महाराजांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. बहुजनांमधील जिव्हाळ्याचे संबंध वाढावे हा या भेटीमागचा उद्देश्य असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले होते. तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर राज्यातील राजकारणात आलेला शिळेपणा दूर होईल, असे आंबेडकर म्हणाले. त्यावर अधिक स्पष्ट कराल का असे विचारल्यावर त्यांनी 2 जूनला त्याबाबत अधिक स्पष्टपणे सांगणार असल्याचे म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना भाजपने खासदार केले, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंना विचारले असता ते म्हणाले की, भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातील खासदारपद दिले, हे आपण कधी नाकारत नसल्याचे ते म्हणाले.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार