LIC Jeevan Umang | 1302 रुपये प्रीमियम देऊन मिळतील 27.60 लाख रुपये, जाणून घ्या या पॉलिसीबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC Jeevan Umang | जर तुम्हाला सुद्धा एलआयसी पॉलिसी (LIC policy) मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज एका चांगल्या प्लान बाबत आपण जाणून घेणार आहोत. एलआयसी जीवन उमंग (LIC Jeevan Umang) एक संपूर्ण जीवन विमा योजना आहे. जीवन उमंग पॉलिसी अनेक बाबतीत दुसर्‍या स्कीमपेक्षा वेगळी आहे. ही पॉलिसी 90 दिवस ते 55 वर्षापर्यंतचे लोक घेऊ शकतात. हा एक एंडोमेंट प्लान आहे. यामध्ये लाईफ कव्हरसह मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळते.

 

मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर फिक्स्ड इन्कम (Fixed income) दरवर्षी तुमच्या खात्यात येईल.
दुसरीकडे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळेल. यामध्ये 100 वर्षांपर्यंत कव्हरेज मिळते.

 

मिळेल 27.60 लाखाची रक्कम

 

LIC Jeevan Umang मध्ये दरमहिना 1302 रुपयांचा प्रीमियम भरला तर एक वर्षात ही रक्कम 15,298 रुपये होते.
जर पॉलिसी 30 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर रक्कम वाढून सुमारे 4.58 लाख रुपये होते.
तुमच्या गुंतवणुकीवर कंपनी 31व्या वर्षापासून 40 हजार दरवर्षी रिटर्न देण्यास सुरू करते.
31 व्या वर्षापासून 100 वर्षापर्यंत 40 हजार वार्षिक रिटर्न घेतला तर सुमारे 27.60 लाख रुपये मिळतील.

 

टॅक्समध्ये मिळते सवलत

 

पॉलिसीधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास टर्म रायडरचा सुद्धा लाभ मिळतो.
बाजार जोखमीचा पॉलिसीवर काहीही परिणाम होत नाही.
या पॉलिसीवर LIC च्या नफा आणि तोट्याचा आवश्यक परिणाम होतो.
इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80सी अंतर्गत पॉलिसी घेतल्यास टॅक्स सवलत मिळते.
जीवन उमंग पॉलिसी चा प्लान घ्यायचा असेल तर किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल.

 

Web Title : LIC Jeevan Umang | lic jeevan umang policy can get you up to rs 28 lakh return for rs 1302 per month details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aryan Khan drugs case | कोण आहेत यास्मीन? समीर वानखेडे यांच्यासाठी ज्यांनी केला मंत्री नवाब मलिक यांच्यावर सर्वात मोठा ‘हल्ला’

Pune Cyber Police | मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर