LIC Kanyadan Scheme | मुलीच्या विवाहासाठी मिळतील 31 लाख रुपये, केवळ जमा करावे लागतील 151 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Kanyadan Scheme | भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी (Daughter’s Marriage) मोठा निधी तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला काही काळ गुंतवणूक करावी लागेल आणि मॅच्युरिटीवर पैसे मिळतील. एलआयसी कन्यादान योजना ही अशीच एक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी पैसे जमा करू शकता आणि लग्नाच्या काळजीपासून मुक्त होऊ शकता. या पॉलिसीबद्दल सविस्तर जाणून घेवूयात.

हा नियम आहे

पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्षापेक्षा कमी नसावे.

ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे परंतु तुमचा प्रीमियम फक्त 22 वर्षांसाठी भरावा लागेल.

तुमची मुलगी एक वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल तेव्हाच तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता. (LIC Kanyadan Scheme)

 

पॉलिसासाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. उत्पन्नाचा दाखला

3. ओळखपत्र

4. पत्त्याचा पुरावा

5. पासपोर्ट आकाराचा फोटो

6. मुलीचा जन्म दाखला

7. याशिवाय एक अर्ज

8. प्रीमियमसाठी चेक किंवा रोख भरू शकता

 

मॅच्युरिटीवर मिळतील 31 लाख
कन्यादान पॉलिसीमध्ये, तुम्हाला दररोज 151 रुपये द्यावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दरमहा 4530 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि नंतर 25 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 31 लाख रुपये मिळतील. याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगले पैसे जमा करू शकता.

 

Web Title :- LIC Kanyadan Scheme | lic kanyadan scheme invest rupees 151 daily and get rupees 31 lakh on maturity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा