Pune Crime | जागेच्या वादातून वारज्यातील दत्तनगरमध्ये ‘राडा’ ! कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाड्याने जागा दिली असता ती बळकावून टोळक्याच्या मदतीने मावस भावाने तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार (Pune Crime) करुन जीवे मारण्याचा (Attempt To Kill) प्रयत्न केला. तर टोळक्याने घराबाहेर लावलेल्या २ मोटारसायकली, रिक्षा व कारची तोडफोड करुन दहशत माजविल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी सागर दगडु बराटे (Sagar Dagadu Barate) (वय ३८, रा. वारजे गाव) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोपी ऊर्फ विजय परबती साष्टे (Gopi alias Vijay Parbati Sashte) (वय ३९, रा. दत्तनगर, वारजे), यश विजय साष्टे (Yash Vijay Sashte), कार्तिक कांबळे (Kartik Kamble) (रा. रामनगर), आकाश ऊर्फ तितल्या मुलजे (Akash alias Titalya Mulje), प्रतिक ऊर्फ राणा क्षीरसागर (Pratik alias Rana Kshirsagar), अमित (Amit), विशाल (Vishal) व इतर दोघांवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. विजय साष्टे याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बराटे हे कन्ट्रक्टर असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे.
त्यांनी राहत असलेल्या शेजारी त्यांचा मावस भाऊ विजय साष्टे (Vijay Sashte) याला १०/१० चे दुकान प्रति १ हजार रुपये भाड्याने १० वर्षापूर्वी दिले होते.
त्याने ते बळकाविले. त्याबद्दल त्यांचा न्यायालयात (Court) वाद चालू आहे.
गोपी साष्टे यांची आई व फिर्यादीची यांची आई या सख्या बहिणी आहे.
त्यांची एक मावशी आशा जाधव या रामनगरमध्ये राहत असून त्या फिर्यादी यांच्या बाजूने आहे, याचा विजय साष्टे याला राग होता.
गेल्या दोन दिवसांपासून विजय व त्याचा मुलगा यश जागेच्या कारणावरुन वाद घालत (Pune Crime) आहे.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता विजय, त्यांचा मुलगा यश व त्यांच्या परिसरात दहशत माजविणारे कार्तिक कांबळे व इतर हातात कोयते, दगड घेऊन आले.
त्यांनी फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक केली. हे पाहून फिर्यादी बाहेर आले असताना आकाश याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला (Attempt To Murder).
परंतु, तो वार फिर्यादीने चुकविला. तेव्हा त्याचा कोयता (Sickle) पत्र्याच्या शेडमधील पत्र्यात अडकून बसला.
त्यामुळे फिर्यादी यांचा जीव वाचला.

 

यावेळी विजय, यश, कार्तिक यांनी कोयत्याने आशा जाधव यांची मुले सुरज व किरण यांच्या गाड्या फोडल्या.
तसेच इतरांनी पार्क केलेल्या रिक्षा व कार यांच्यावर दगड मारुन त्या फोडल्या.
त्यांना रोखण्यासाठी काही रहिवासी व रिक्षाचालक आले असताना त्यांना आकाश याने धमकावले.
कोणी पुढे आला तर खांडोळी करुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे लोक घाबरुन पळून गेले.
ही संधी साधून फिर्यादी त्यांचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेले.
वारजे पोलिसांनी (Warje Police) खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन विजय साष्टे याला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Incident in Duttnagar in Warja due to land dispute Vehicles vandalized with a scythe

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा