LIC New Jeevan Shanti Policy | रिटायर्मेंटनंतर सुद्धा भासणार नाही पैशांची चणचण, फक्त खरेदी करा एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी

नवी दिल्ली : LIC New Jeevan Shanti Policy | वाढत्या वयाबरोबरच एक वेळ अशी येते की व्यक्तीला निवृत्तीबाबत चिंता वाटू लागते. निवृत्तीनंतर आर्थिक संकटे टाळण्यासाठी प्रत्येकजण विविध योजना आखतो. (LIC New Jeevan Shanti Policy)

सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी (LIC New Jeevan Shanti Policy) देते.

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी ही एक अ‍ॅन्युइटी प्लान आहे, जो एका सिंगल प्रीमियमद्वारे खरेदी करता येतो. हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटींग आणि सिंगल प्रीमियम अ‍ॅन्युइटी प्लान आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळू शकते.

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये ३० ते ७९ वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. ही पॉलिसी जोखीम कव्हर प्रदान करत नाही. तुम्ही यात दोन पर्यायांपैकी एक निवडू शकता : एकल जीवनसाठी आस्थगित वार्षिकी (सिंगल अ‍ॅन्युइटी प्लान) किंवा संयुक्त जीवनासाठी आस्थगित वार्षिकी (जॉइंट अ‍ॅन्युइटी प्लॅन).

एकल प्रीमियम गुंतवणुकीसह, तुम्हाला १ ते १२ वर्षांत तुमची पेन्शन मिळेल. उदाहरणार्थ, ३० वर्षांच्या व्यक्तीने ५ वर्षांपर्यंत
१० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्याला ८६,७८४ रुपये पेन्शन मिळेल. १२ वर्षांनंतर ते वार्षिक १,३२,९२० रुपये आहे.

४५ व्या वर्षी १० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास ५ वर्षांत ९०,४५६ रुपये आणि १२ वर्षांत १,४२,५०८ रुपये वार्षिक
पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग