LIC Nivesh Plus Plan : मोठा रिटर्न मिळवण्यासाठी एकदाच करा गुंतवणूक, जाणून घ्या पॉलिसीची वैशिष्ट्य

नवी दिल्ली : इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल पण द्विधा मनस्थिती असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. एलआयसीची एक स्कीम आहे, जिथे गुंतवणूक करून चांगला नफा कमावू शकता. जर तुमची कमाई खुपच कमी असेल तरी सुद्धा गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल तरी सुद्धा तुम्हाला यांच्यापेक्षा दुसरी चांगली संधी नाही. आम्ही आपल्याला एलआयसीच्या एका अशा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊ ज्याद्वारे खुप चांगले फायदे मिळतील.

पैसे कधीही बुडत नाहीत
एलआयसीची सर्वात मोठी गोष्ट ही आहे की यामध्ये लावलेले पैसे बुडत नाहीत. येथे जमा रक्कमेवर सॉवरेन गारंटी मिळते. आपण माहिती घेणार आहोत एलआयसीच्या निवेश प्लस प्लॅनबाबत, यामध्ये सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, युनिट-लिंक्ड आणि व्यक्तीगत जीवन विमा आहे, जो पॉलिसीच्या दरम्यान विम्यासह गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय देतो.

ऑफलाइन आणि ऑनलाइन खरेदी करू शकता प्लॅन
हा प्लॅन तुम्ही ऑफलाइनसह ऑनलाइनसुद्धा खरेदी करू शकता. बेसिक सम अश्युर्ड निवडण्याची सुद्धा सुविधा आहे. सम अ‍ॅश्युर्डचा पर्याय सिंगल प्रीमियमच्या 1.25 पट किंवा सिंगल प्रीमियमच्या 10 पट आहे. या प्लॅनमध्ये 4 प्रकारचे फंड उपलब्ध आहेत. हा आहे बाँड फंड, सिक्युर्ड फंड, बॅलंस्ड फंड आणि ग्रोथ फंड. यापैकी कशातही तुमच्या इच्छेप्रमाणे गुंतवणूक करू शकता.

निवेश प्लस स्कीमची वैशिष्ट
* एलआयसी निवेश प्लस स्कीम घेण्यासाठी किमान प्रवेश वय 90 दिवस ते 65 वर्ष आहे. तर पॉलिसीचा टेन्चर 10 ते 35 वर्ष आहे आणि लॉक-इन पीरियड 5 वर्ष आहे.
* प्रीमियमवर मिनिमम लिमिट 1 लाख रुपये आहे, म्हणजे यामध्ये किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी.
* तर, यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. कमाल मॅच्युरिटी वय 85 वर्ष आहे.
* जर पॉलिसी होल्डर पॉलिसी टर्मपर्यंत जिवंत राहात असेल, तर त्यास मॅच्युरिटी बेनिफिट प्राप्त होतो, जो युनिट फंड मूल्याच्या बरोबरीने असतो. हा पॉलिसी कालावधी संपल्यानंतर मिळतो.
* याशिवाय कंपनी फ्री-लुक पीरियड आपल्या ग्राहकांना देते. जर कंपनीकडून पॉलिसी थेट खरेदी केली तर 30 दिवसांचा फ्री-लुक पीरियड मिळतो. या दरम्यान ग्राहक पॉलिसी परत करू शकतात.

पॉलिसीधारकाला एकदाच करावे लागते पेमेंट
जर पॉलिसी कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला डेथ बेनिफिट प्राप्त करण्याचा अधिकार आहे. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू जोखिम सुरू होण्याच्या तारखेपूर्वी झाला तर युनिट फंड व्हॅल्यूच्या बरोबरीने रक्कम नॉमिनीला मिळते. एलआयसी निवेश प्लस प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 6व्या पॉलिसी वर्षानंतर अंशत: पैसे काढण्याची परवानगी देते. अल्पवयीनांच्या प्रकरणात 18 वर्षाच्या वयानंतर अंशत: रक्कम काढण्याची परवानगी मिळते. या पॉलिसीमध्ये विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीला एकदाच पेमेंट करावे लागते. हा फंड एलआयसी पॉलिसी होल्डरच्या प्रेफरन्सनुसार, इन्व्हेस्ट करतो. यामध्ये तुम्ही पॉलिसीचे ड्यूरेशन 10 ते 25 वर्षाच्या दरम्यान निवडू शकता.