Lieutenant General Madhuri Kanitkar | डॉ. कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर (Madhuri Kanitkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज (मंगळवार) डॉ. कानिटकर यांची कुलगुरू पदावर नियुक्ती जाहीर केली. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Madhuri Kanitkar) या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुमख (DCDIS Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

पुण्यातून MBA ची पदवी प्राप्त

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1960 रोजी झाला. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीएची पदवी प्राप्त केली. डॉ. कानिटकर यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी प्राप्त केले आहे. 2017 ते 2019 या कालावधीत सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. तसेच त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा 22 वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2008 साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.

समिती गठित करण्यात आली होती

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाला
होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Pune University) कुलगुरु
डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. कुलगुरु नियुक्तीसाठी
राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली
कुलगुरु निवड समिती गठित केली होती. दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे या समितीचे सदस्य होते.

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | 10,000 लाच मागितल्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह 2 पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Lieutenant General Madhuri Kanitkar | lieutenant general madhuri kanitkar new vice chancellor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update