कापुरामुळं ‘या’ शारीरिक समस्या होतात दूर ! जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देवाची आरती करताना वापरला जाणारा कापूर शरीरासाठीही खूप आरोग्यदायी आहे. याचा आरोग्यासाठी कशा प्रकारे वापर केल्यानं कोणते फायदे मिळतात याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

1) कापरामुळं जखम लवकर भरून निघते – त्यासाठी पाण्यात थोडासा कापूर मिक्स करून ते पाणी जमखेवर लावावं. यामुळं आराम मिळेल.

2) केसातील कोंडा कमी होतो – खोबरेल तेलात कापूर टाकून त्या तेलानं केसांना मसाज करावी आणि नंतर केस धुवून टाकावेत.

3) शरीरावर सतत खाज येत असेल तर कापूर घातलेलं तेल प्रभावित जागेवर लावावं.

4) कापूर तेलानं मसाज केल्यानं सांधेदुखी कमी होते.

5) पायांच्या भेगा कमी होण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.