‘असं’ जपा पायांचं सौंदर्य ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – पावसाळा हा ऋतु सर्वांनाच आवडतो. परंतु या दिवसांमध्ये हातापायांची खूप स्वच्छता ठेवावी लागते आणि काळजी घ्यावी लागते. आज यासाठी आपण काही टीप्स जाणून घेणार आहोत.

1) आपले पाय नेहमी कोरडे ठेवावेत.

2) पावसात भिजून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करा. तसंच पायांच्या बेचक्यांमध्ये जमा झालेला चिखल स्वच्छ करा.

3) अनवाणी पायानं चालू नका.

4) थंड जमिनीवर अथवा पावसाळ्यातील ओल्या गवतावर अनवाणी पायांनी फिरणं टाळावं. यामुळं पायांना जंतुसंसर्ग आणि बुरशीजन्य संसर्ग याची लागण होण्याची शक्यता दाट असते.

5) जर तुमचे पाय जास्त वेळ पावसाच्या पाण्यात राहिले असतील तर कोमट पाण्यात थोडंसं मीठ घाला आणि त्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा.

6) पायांसाठी अँटीफंगल पावडरचा वापर करा. पायात मोजे घालण्यापूर्वी पाय स्वच्छ कोरडे करून घ्या.

7) पायांसाठी चांगल्या क्रिमची निवड करून रोज मॉईश्चराईज करा.

8) पायांची नखं वेळोवेळी कापावीत. वाढलेल्या नखात घाण जाऊन संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळं पायाची नखं जास्त न वाढवता ते वेळीच कापणं गरजेचं आहे.

9) चांगल्या प्रतीच्या पादत्राणांची निवड करा. पादत्राणं नेहमी कोरडी ठेवावीत. सर्वच बाजूनं बंद असणाऱ्या पादत्राणांची निवड करू नका.

10) पावसाळ्यात गमबुट वापरणं उत्तम ठरतं. यामुळं साचलेल्या घाण पाण्यापासून पायाचं संरंक्षण होतं.

11) पायाला एखादी जखम झाली असेल तर तिची नीट काळजी घ्या. घाण पाणी, माती हे जखमेत शिरणार नाही याकडं लक्ष द्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.