Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स्, रॉयल्स् पासलकर, गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी, बाश्री ब्लास्टर्स संघ उपांत्य फेरीत

पुणे : Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत लवास रॉयल्स्, रॉयल्स् पासलकर, गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि बाश्री ब्लास्टर्स संघांनी अव्वल गुण मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत राजेंद्र मदने याच्या नाबाद ७२ धावांच्या जोरावर गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी संघाने बाश्री ब्लास्टर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बाश्री ब्लास्टर्स संघाने १६२ धावा धावफलकावर लावल्या. फैयाझ लांडगे याने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. हे आव्हान गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी संघाने अखेरच्या षटकामध्ये आणि ६ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये राजेंद्र मदने याने नाबाद ७२ धावा केल्या आणि संघाला एकहाती विजय मिळवून दिला. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

पुष्कराज जोशी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिक्षीत रॉयल्स् संघाने स्वयुश स्ट्रायकर्स संघाचा १३६ धावांनी धुव्वा उडविला. पुष्कराज जोशी याच्या ७७ धावा आणि महेश दिवटे याच्या नाबाद ७२ धावांच्या जोरावर दिक्षीत रॉयल्स्ने २१५ धावांचा डोंगर उभा केला. पुष्कराज जोशी आणि महेश दिवटे यांनी चौथ्या गड्यासाठी ७२ चेंडूत १४७ धावांची भागिदारी करून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाला उत्तर देताना स्वयुश स्ट्रायकर्स संघाचा डाव ७९ धावांवर गुंडाळण्यात आला. पुष्कराज जोशी (२-९) आणि गिरीष ओक (२-८) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
बाश्री ब्लास्टर्सः २० षटकात ७ गडी बाद १६२ धावा (फैयाझ लांडगे नाबाद ३२, अतुल भगत १८, विकास डांगे १८,
महेश शिंदे ३-२३, प्रफुल्ल मानकर २-३६) पराभूत वि. गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीः १९.५ षटकात ६ गडी
बाद १६६ धावा (राजेंद्र माने नाबाद ७२ (५३, ७ चौकार, ३ षटकार), नितीन काटे ३९, सचिन जयवंत २-१०);
सामनावीरः राजेंद्र मदने;

दिक्षित रॉयल्स्ः २० षटकात ५ गडी बाद २१५ धावा (पुष्कराज जोशी ७७ (५३, १२ चौकार, १ षटकार),
महेश दिवटे नाबाद ७२ (३७, ७ चौकार, ३ षटकार), सचिन कापडे ३-२७);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी
पुष्कराज आणि महेश यांच्यात १४७ (७२) वि.वि. स्वयुश स्ट्रायकर्सः १५.४ षटकात ६ गडी बाद ७९ धावा
(रघुनाथ शिंगाडे २२, पुष्कराज जोशी २-९, गिरीष ओक २-८); सामनावीरः पुष्कराज जोशी.

Web Title :- Lions Veterans Cup T-20 Cricket | ‘Lions Adult Trophy’ T20 Cricket 2023 tournament in memory of Lion Sagar Dhomse; Lavas Royals, Royals Pasalkar, Gargi Educon & Smart Technology, Bashree Blasters teams in semi finals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना