माजगावमध्ये पोलिसांकडून दारू अड्डा उध्वस्त

ADV

माजलगाव : पोलीसनामा ऑनलआईन – माजलगाव शहराच्या हद्दीत सुरु असलेल्या दारूच्या अड्ड्यावर धाड पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी धाड टाकली. गौतम नगरमध्ये टाकलेल्या घाडीत त्यांनी दारू अड्ड्यातील हजारो रुपयांचे १ हजार लिटर रसायन नष्ट केले. याप्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.

ADV

ग्रामीण भागांमध्ये अवैधपणे निकृष्ट रसायनांचा वापर करून दारू तयार करण्याचे अड्डे सुरु असतात. या अड्ड्यांमध्ये तयार केलेली दारू पिऊन अनेकांचा मृत्यूही होतो.  अशाच प्रकारचा एक अवैध दारू अड्डा माजलगाव शहर हद्दीतील गौतम नगर परिसरात सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकासह तेथे जाऊन धाड टाकली. या धाडीत हजारो रुपयांचे १ हजार लिटर रयायन नष्ट करण्यात आले. तर तेथे दारु अड्डा चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.