काय सांगता ! हो, चंद्रकांत पाटील यांच्यावर 42 लाखांचं कर्ज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आजच आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर 42 लाख 52 हजार 821 रुपयांचं कर्ज आहे. चंद्रकांत पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आजच पुण्यातील कोथरूड भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी त्यांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय काकडे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चंद्रकांत पाटील यांच्या नावे 75 लाख 50 हजार 800 आणि पत्नीच्या नावे 1 कोटी 94 लाख अशी मिळून 2 कोटी 69 लाख 51 हजार 675 रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांच्यावर 42 लाखांचं कर्ज असल्याचंही यातून समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल के्ल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. या निवडणुकीत आमच्या 220 पेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि आमचे सरकार येईल.” असा विश्वासही यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com