Lok Sabha Election 2024 | EVM ची कपॅसिटी 300, त्यावर उमेदवार गेले तर ‘बॅलेट पेपर’वर निवडणुक, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election 2024 | कुठल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनचे काम पूर्ण करु. EVM ची कपॅसिटी ३०० उमेदवारांची आहे. ३००च्या वर उमेदवार गेले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे. यासाठी २० मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख ३० मार्च आहे, अशी माहिती चोक्कलिंगम (IAS S. Chockalingam) यांनी दिली.

आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी कोण-कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, याविषयी माहिती देताना ते म्हणाले, रामटेक – १ , भंडारा-गोंदिया २, गडचिरोली-चिमूर – २, चंद्रपूर – ० इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.(Lok Sabha Election 2024)

उमेदवार आणि मतदारांना आवाहन करताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, कामकाजाचे दिवस कमी आहेत, त्यामुळे ते बघून अर्ज करावे. १७ मार्च ते २२ मार्च या एका आठवड्यात १ लाख ८४ हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. आणखी मुदत बाकी आहे. लवकरात लवकर नवीन मतदारांनी नोंदणी करावी.

आचारसंहितेसंबंधी माहिती देताना एस. चोक्कलिंगम म्हणाले, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत ३०८
बिना परवान्याची शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. परवाना असलेली ४५ हजार ७५५ शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आहेत.
१३ हजार इसमांवर कारवाई केली आहे. मतदानाच्या दिवशी पेड हॉलिडे द्यावी. मतदानाच्या दिवशी ड्राय डे आहे.
८५ वर्षांवरील नागरिकांना गृह मतदानाची सुविधा असेल.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले, आचारसंहिता सुरु झाल्यापासून मुंबई उपनगरातून सर्वात
जास्त रोकड जप्त केली आहे. मुंबई उपनगरातून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये रोकड जप्त केली आहे.
आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. आम्ही भारतीय निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी पोहोचवत आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”