Lok Sabha Election In Maharashtra | शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एन्ट्रीने मूळ भाजप पदाधिकार्‍यांचा पक्षत्याग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या विश्‍वासार्हतेला छेद?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election In Maharashtra | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विकासाच्या दूरदृष्टीकडे पाहून देशभरातून अनेकजण भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. राज्यातच शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर भाजपसोबत सत्तेत गेलेल्या गटाने मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सोबत गेल्याचे जाहीर केले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखिल लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठींबा दिल्याने भाजपचे बळ वाढले आहे. परंतू एकिकडे विरोधक मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत असताना मूळ भाजपलाही गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. मूळ भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षांतर करू लागल्याने मोदी यांच्या विकासाच्या विश्‍वासार्हतेबाबत चर्चा झडू लागल्या आहेत.

जळगावचे भाजपचे (Jalgaon Lok Sabha) विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश (Shivsena UBT) करून ‘मशाल’ हाती घेतली. त्याच मतदारसंघामध्ये पाटील यांचे भाजपमधील सहकारी करण पवार यांना ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. माढा मतदार संघातील (Madha Lok Sabha) राजकिय प्रस्थ असलेले कुटुंब विजयसिंह मोहिते (Vijaysinh Mohite–Patil) यांचे चिरंजीव धैर्यशील पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपचा त्याग करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणुकीची तयारी केली आहे.(Lok Sabha Election In Maharashtra)

मोहिते कुटुंब मागील पाच वर्षांपुर्वी भाजपमध्ये गेले असून याच कुटुंबातील रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite-Patil) हे भाजपकडून राज्यसभेवर खासदार आहेत. पुणे जिल्ह्यात भाजपचा कुठेही मागमूस नसताना एकाकी लढा देणारे सलग दहावर्षे जिल्हाध्यक्ष राहीलेले नामदेव ताकवणे (Namdev Takawane) यांनी देखिल भाजपची साथ सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर आज शिरूर मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे (Khed Alandi Vidhan Sabha) भाजपचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख (Atul Deshmukh) यांच्यासह राजगुरूनगर, चाकण, आळंदीचे पक्षाचे अध्यक्ष, अनेक सरपंच आणि पदाधिकार्‍यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

वरिल घटना राजकिय सारीपाटावर वरकरणी नित्याच्या वाटत असल्यातरी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांची विश्‍वासार्हता आणि त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी केलेल्या राजकिय तडजोडींमध्ये पक्षाच्या निष्ठावंतांचा बळी दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. देशाच्या राजकारणाचा कॅनव्हास हा व्यापक असला तरी तो रंगवताना स्थानीक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या काही राजकिय इच्छा आकांक्षा निश्‍चितच असतात. मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्याचे पक्षाचे उद्दीष्ट असले तरी स्थानीक पातळीवर अगदी सरपंच, नगरसेवक, आमदारकीची इच्छा ठेवूनच कार्यरत असतात.

राजकिय पक्षांच्या फोडाफोडीच्या राजकारणात एकंदर राजकिय विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असताना शिवसेना, रिपाइं, अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आल्याने आपले राजकिय भविष्य काय? असा सर्वसामान्य प्रश्‍न भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होउ लागला आहे. संघटनात्मक कामात अनेक वर्ष त्याग केल्यानंतर जेंव्हा सत्तेची फळे चाखायची वेळ आल्यानंतर पारंपारिक विरोधकच वाटेकरी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे पंतप्रधान मोदी यांच्यासारखे नेतृत्व असतानाही भाजपचे मूळचे कार्यकर्ते बाहेर पडू लागल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवू लागले आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

प्रातिनिधिक खदखद

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत संघर्ष राहीला आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानीक आमदार दिलीप मोहीते पाटील गेली अनेकवर्षे दडपशाही करत आले आहेत. त्यांच्या या दडपशाही विरोधात संघर्ष करून राजगुरूनगर नगर परिषद, आळंदी नगरपरिषदेत सत्तेसह सह अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता आणली. मात्र, आमच्या वाटयाला उपेक्षाच आली. पक्ष नेतृत्वाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. यामुळे नाराज होउन तालुक्याच्या विकासासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेत आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत.

  • अतुल देशमुख, खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे समन्वयक, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुण्यात भाऊ, तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Video)