Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections 2024) इंडिया आघाडीतील (India Alliance) कोणता पक्ष किती जागा लढविणार याबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात लवकरच घोषणा केली जाईल. महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व ४८ जागा निवडून येतील, असे वक्तव्य काँग्रेस (Congress) पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला (MLA Ramesh Chennithala) यांनी केले. ते पुण्यातील शिवाजीनगर येथे आयोजित पश्चिम विभागीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. (Lok Sabha Elections 2024 )

या बैठकीला रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, आमदार रविंद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला म्हणाले, सध्याचे केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात असून महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलत नाही. पण आम्ही इंडिया आघाडी देशभरात सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला निश्चित यश मिळेल. सध्याचे राज्य सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही. ते ईडी आणि सीबीआयचे सरकार आहे, असे म्हणत चेन्नीथला यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली.

यावेळी चेन्नीथला यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार का, म्हणून विचारण्यात आले.
यावेळी तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, असे चेन्नीथला म्हणाले.
मात्र चेन्नीथला यांच्या बाजूला बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हात जोडले.
चव्हाण यांच्या या कृतीची सध्या चर्चा होत आहे. दरम्यान, राज्याच्या कोणत्याही भागातून पृथ्वीराज चव्हाण
हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास ते कुठूनही निवडून येतील, असे चेन्नीथला म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीत घेण्याबाबत रमेश चेन्नीथला म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी
सोबत घेण्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. त्यांना सोबत घेण्यास काँग्रेसची सहमती आहे.
त्या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : क्रिकेट खेळण्यावरुन तरुणांमध्ये राडा, दोघांना बेदम मारहाण; 8 जणांवर FIR

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल चोरले, तर सिंहगड रोड परिसरात फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

Pune Police MPDA Action | आंबेगाव परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 92 वी स्थानबध्दतेची कारवाई

मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात