समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनास कुलूप ठोकले 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – घरकुल योजनेचा प्रथम हप्ता द्यावा या मागणीसाठी लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनास कुलूप ठोकले आहे. लाभार्थ्यांनी वेळोवेळो मागणी करूनही समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी ही कृती केली.

महानगरपालीका क्षेञातील रमाई घरकुल योजनेकरीता निवड केलेल्या ३६६ लाभार्थींना घरकुल बांधकामाचा प्रथम हप्ता वितरीत करण्यात यावा या मागणीसाठी २० फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरु आहे. तसेच लाभार्थ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केली. माञ समाज कल्याण खात्याचे अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. यामुळे आंदोलन कर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली.

मंगळवारी संतप्त लाभार्थ्यांनी समाज कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढला. सहाय्यक आयुक्त कर्मचारी यांचे दालनात प्रवेश करत रिकाम्या खुर्चीला झेंडुच्या फुलांचा हार अर्पण करत गांधीगीरी केली. निवेदन खुर्चीला चिटकवले व दालना बाहेर येत कार्यालयाला कुलुप ठोकले. आंदोलनात लाभार्थी महिला-पुरुष मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व वाल्मिक दामोदर यांनी केले.