Loksabha Election 2024 | कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण? मातोश्रीवर इच्छूकांची बैठक, हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुका (Loksabha Election 2024) जवळ आल्याने मविआ आणि महायुतीची विविध मतदार संघात उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील (Kolhapur Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. (Loksabha Election 2024)

कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच येथील हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राजू शेट्टी (Raju Shetti) यांना पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील दोन्ही विद्यमान खासदार उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे आगामी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचपणी सुरू आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षानी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र विद्यमान आमदार हे शिवसेनेचे असल्याने दोन्ही जागांवर आमचाच उमेदवार, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. (Loksabha Election 2024)

मविआच्या जागा वाटपाच्या बैठकीत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर कोल्हापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे.
यामुळेच आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची मातोश्रीवर बैठक घेण्यात आली आहे.

मातोश्रीवरील बैठकीला कोल्हापूर मतदारसंघातून इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे,
माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी इच्छूक उमेदवारांची मतदार संघातील ताकद जाणून घेण्यात येणार आहे.

तर कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता असून
येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे चिरंजीव प्रतीक पाटील याला उमेदवारी देण्याची
मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) कार्यकर्त्यांनी केली आहे.

परंतु, पक्षफुटीमुळे येथे झालेले नुकसान पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना
मविआ पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
याबाबत विचारले असता राजू शेट्टी यांनी सध्यातरी ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष असल्याचे म्हणत उत्तर देणे टाळले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अजित पवारांना पश्चाताप, अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी, विनायक राऊत यांचे धक्कादायक दावे