MP Vinayak Raut | अजित पवारांना पश्चाताप, अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी, विनायक राऊत यांचे धक्कादायक दावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार हे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. शिवाय, पुण्यात पवार कुटुंबियांच्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाल्यानंतर अजितदादा यांनी थेट दिल्लीला जाऊन अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती, याबाबत बोलताना विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी हे दावे केले आहेत.

विनायक राऊत यांनी म्हटले की, अजित पवार यांना आता पश्चाताप झाला आहे. यातून मुक्त कसे व्हावे याचा ते विचार करत आहेत. अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला खरा वाव देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केले होते. परंतू, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले, प्रत्येक गोष्टीत अजित पवारांची गळचेपी केली जात आहे. गेल्या आठवड्यातील अमित शहांच्या भेटीत शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी अजितदादांनी केली आहे.

राऊत यांनी म्हटले की, डिसेंबर महिन्यात महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार आहे.
तीन तिघाडा काम बिघाडा अशी आपल्याकडे म्हण आहे.
फक्त ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे शिंदे गट (Shinde Group)
आणि अजित पवार गट (Ajit Pawar Group) सत्तेत सहभागी झाले आहेत.
ते त्यांच्यात मिसळलेले नाहीत. भाजपाची (BJP) हाव खूप मोठी असल्याने
आपलेच घोडे रेटण्याचे काम होणार आहे. यामुळे ३१ डिसेंबरपूर्वीच महायुतीत मोठा स्फोट होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thackeray Group Leader Arrested | दादा भुसे यांचे कट्टर विरोधक असलेल्या ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याला अटक, प्रकरण नेमकं काय?

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल,
”काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात जातात आणि निकालानंतर…”

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा,
‘आनंदाचा शिधा’मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…’