लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांच्याकडून अभिवादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकशाहीर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती आहे. आण्णाभाऊ साठे यांची जयंती नागरिक मोठ्या उत्सवाने साजरी करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी अभिवादन करून पुष्पाहार घालून मानवंदना देण्यात दिली.

यावेळी अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी देखील सारसबागेतील आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.