Lonavala News | नगरपालिका शाळेच्या सुशोभीकरणाने रहिवाशांना आणले रस्त्यावर

लोणावळा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Lonavala News |लोणावळा नगरपालिकेच्या (lonavala municipal council) गवळीवाडा येथील प्राथमिक शाळेच्या सुशोभीकरणाने गवळीवाडा परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या आठवड्यात रस्त्यावर आणले. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने गवळीवाडा परिसरातील अनेक घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या रहिवाशांवर ही आपत्ती ओढवली शाळेच्या सुशोभीकरणाने. नगरपालिकेने (lonavala municipal council) गेल्या वर्षी गवळीवाडा शाळेचे सुशोभीकरण केले. शाळेला कॉम्पाऊंड वॉल घालण्याबरोबरच शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहाचे नुतनीकरण केले. मैदानावर चकचकीत रंगीबेरंगी टाईल्स बसविल्या गेल्या. सुशोभीकरणावर लाखो रुपयांची उधळपट्टी करताना या शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या भूमिगत रिलिफ गटाराचे भले मोठे पाईप संबंधित कंत्राटदाराने व अभियंत्याने उखडून शाळेबाहेर टाकून दिले. इतकेच नव्हे तर पावसाळी पाण्याचा निचरा करणारी ही वाट सिमेंट कॉक्रिटने बंद करून टाकली.

लोणावळ्यात दरवर्षी सरासरी 175 इंच पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात लोणावळा परिसरातील सर्वच डोंगरदऱ्यातून धबधबे सुरु होतात. साहजिकच या डोंगरावरील पाणी सखल भागाच्या दिशेने वाहून येथील पावसाळी गटारे व नाले आपल्या सिमाभिंती ओलांडून वाहू लागतात. अशा परिस्थितीत सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्याचे धोके संभवतात. हे विचारात घेऊनच 16-17 वर्षापूर्वी गवळीवाडा भागातील लोकप्रतिनिधींनी शाळे जवळून जाणाऱ्या गटारालगत हे भूमिगत रिलिफ गटार तयार करवून घेतले होते. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात पावसामुळे अशी आपत्ती येथील रहिवाशांवर ओढविली नव्हती, असे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गवळी यांनी सांगितले.

Lonavala News | Municipal school beautification brought residents to the streets

गेल्या शुक्रवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने मारुती अप्पा गवळी ( घर. नं. 14बी वॉर्ड), अजय पहिलवान (घर. नं. 18, बी वॉर्ड), अर्जून दिगंबर बिडकर (घर नं. 18, बी वॉर्ड) आणि अनिल वामन कडूसकर (घर नं. 16 व 17, बी वॉर्ड) यांच्या घराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले. चहु बाजूने घरात शिरणाऱ्या या पाण्याकडे हताशपणे पाहण्यापलिकडे ते काहीही करू शकले नाहीत. पहाटेच्या वेळी झोपेत असताना आलेल्या आस्मानी संकटाने या सर्वांचे संसार वाहून गेले. फर्निचर व मालमत्तेचे नुकसान झाले. हे सर्व झाले ते घरालगत असलेल्या शाळेच्या सुशोभीकरणाने असे या सर्वांनी सांगितले.

Lonavala News | Municipal school beautification brought residents to the streets

बिडकर, कडूसकर, पहिलवान व गवळी यांची घरे गवळीवाडा परिसरातून जाणाऱ्या पुणे- मुंबई रस्त्यालगत सखल भागात आहे.
पाण्याचा निचरा करण्यासाठी येथे गेल्या 70 वर्षापासून गटार बांधलेले आहे.
चार ते पाच फूट उंचीच्या या गटाराला एसटी स्टँड, तसेच तुंगार्ली परिसरातून येणारी गटारे जोडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सर्व भागातून येथे पाण्याचे लोंढे येतात.
शाळेच्या सीमाभिंतीलगत तर गटारातील पाण्याची पातळी चार- पाच फूटावर जाते.
रिलिफ गटारामुळे वाढलेल्या या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत असे.
गेल्या वर्षी हे रिलिफ गटारच बंद करण्यात आले. शुक्रवारी (दि. 22 जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे वाढलेल्या या पाण्याला पुढे सरकण्यास पुरेशी जागाच मिळाली नाही.
परिणामी अडून राहिलेल्या या पाण्याला फुगवटा निर्माण झाला व गटारातील पाण्याची पातळी वाढून ते भिंतींवरून नागरिकांच्या घरात शिरले, असेही गवळी यांनी स्पष्ट केले.

शाळेच्या सुशोभीकरणाचे काम सुरु असताना कंत्राटदाराने रिलिफ गटाराचे पाईप उखडलेले दिसताच, या कामाला आपण जोरदार विऱोध केला होता.
परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत संबंधित कंत्राटदार, त्याचे पाठीराखे व प्रशासनाने विरोध डावलून हे काम रेटून पूढे नेले, असेही गवळी यांनी सांगितले.
भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने हे रिलिफ गटार पूर्ववत बांधून द्यावे,
अशी रहिवाशांची मागणी आहे.

Web Title : Lonavala News | Municipal school beautification brought residents to the streets

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पैशाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर खुनी हल्ला, हडपसरमधील ससाणे नगरमधील घटना

Wakad Police | सराईत 3 वाहन चोरटे गजाआड, 2.5 लाखांच्या 7 दुचाकी जप्त

Vishwajeet Kadam | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी