Long Weekends 2022 | ‘या’ तारखांना येतील 2022 मधील ‘लाँग वीकेंड’, ऑगस्टमध्ये तर सुट्ट्याच-सुट्ट्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Long Weekends 2022 | कोरोनाच्या विध्वंसामुळे जर 2021 मध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला नसाल तर 2022 मध्ये यासाठी खुप संधी मिळतील. नवीन वर्षात अनेक असे लाँग वीकेंड असणार आहेत ज्यामध्ये तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करू शकता. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत मिनी ट्रिपला जाऊ शकता. हे लाँग वीकेंड केव्हा-केव्हा आहेत आणि हवामानानुसार कोणत्या ठिकाणी जावे ते जाणून घेवूयात. (Long Weekends 2022)

 

जानेवारीमधील लाँग वीकेंड (Long weekend in January 2022) –

 

1 जानेवारीला शनिवार आणि 2 जानेवारीला रविवार आहे. अशावेळी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला सुट्टीचे प्लॅनिंग केल्यास नवीन वर्ष चांगल्या ठिकाणी साजरे करता येईल.
यानंतर 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15-16 जानेवारीला शनिवार-रविवार येईल. यावेळी तुम्ही मिनी ट्रिपची योजना करू शकता.
जर तुम्हाला मोठ्या ट्रीपवर जायचे असेल तर जानेवारीचा शेवटचा आठवडा हा उत्तम काळ आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. जर तुम्ही 27-28 जानेवारीला सुट्टी घेतली तर 29 आणि 30 तारखेला शनिवार-रविवार येत आहे.
यामध्ये तुम्ही कोणत्याही चांगल्या ठिकाणी जाऊ शकता.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

यादरम्यान तुम्ही गुजरातला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव पाहण्यासाठी जाऊ शकता.
तुम्ही बिकानेर, जम्मू आणि काश्मीरला जाऊ शकता किंवा स्कीईंगचा आनंद घेण्यासाठी औली येथे जाऊ शकता.

 

फेब्रुवारी-मार्चमधील लाँग वीकेंड (Long weekend in February-March 2022) –

 

वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात 26 आणि 27 फेब्रुवारीला शनिवार-रविवार येईल. तर 1 मार्च रोजी महाशिवरात्री असेल.
अशावेळी 28 फेब्रुवारीला सुट्टीची व्यवस्था करता आली तर चार दिवसांच्या ट्रीपचे नियोजन करता येईल.
यानंतर होळी 18 मार्च रोजी असून 19-20 रोजी शनिवार-रविवार पडेल.
यामध्येही तुम्ही तीन दिवसांच्या मिनी टूरला जाऊ शकता. (Long Weekends 2022)

 

कुठे जायचे (Where to go) –

 

फेब्रुवारी-मार्चच्या या वीकेंडमध्ये तुम्ही वृंदावन, मथुरा येथे जाऊ शकता, तिथे होळी अतिशय नेत्रदीपक पद्धतीने साजरी केली जाते.
याशिवाय राजस्थानमधील रणथंबोर किंवा माउंट अबूकडेही जाता येईल.

 

एप्रिल-मेमधील लाँग वीकेंड (Long weekend in April-May 2022) –

 

एप्रिलच्या मध्यातही तुमच्यासाठी सलग चार सुट्ट्या येत आहेत. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.
यानंतर 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि 16-17 रोजी शनिवार-रविवार असेल. अशा प्रकारे तुम्ही चार दिवसांच्या सुट्टीसाठी जाऊ शकता.
यानंतर 30 एप्रिलला शनिवार आणि मे महिन्याचा पहिला रविवार असेल.
त्यानंतर 3 मे रोजी ईद-उल-फित्र आहे. दरम्यान, जर तुम्ही 2 मेची सुट्टी घेऊ शकत असाल, तर संपूर्ण चार दिवस मिळतील. 14 आणि 15 मे रोजी शनिवार-रविवार, तर 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

एप्रिलच्या या चार दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जम्मू-काश्मीर किंवा उदयपूरसारख्या ठिकाणी जाऊ शकता.
स्कीइंगसाठी तुम्ही गुलमर्गसारख्या ठिकाणी जाऊ शकता. ऋषिकेश, मसुरी, स्पिती व्हॅली आणि धर्मशाळा हे देखील या हंगामात भेट देण्यासाठी चांगले पर्याय आहेत.

 

जुलैमधील लाँग वीकेंड (Long weekend in July 2022) –

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही जूनमध्ये मोठा वीकेंड नसेल. पण जुलै महिन्याची सुरुवात रथयात्रेने होईल आणि त्यानंतर 2-3 जुलै रोजी शनिवार-रविवार असेल.
अशा प्रकारे तुम्ही तीन दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीला जाऊ शकाल.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जगन्नाथपुरीची रथयात्रा पाहायला जाऊ शकता. याशिवाय व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क (उत्तराखंड), स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश, धर्मशाळा किंवा अमरनाथ, अशा कोणत्याही थंड ठिकाणी जाता येते.

 

ऑगस्टमधील लाँग वीकेंड (Long weekend in August 2022) –

 

ऑगस्ट महिना लाँग वीकेंडने भरलेला आहे. 6-7 ऑगस्टला शनिवार-रविवार आणि 8 तारखेला मोहरम आहे.
याशिवाय 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, 13-14 रोजी शनिवार-रविवार आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
दरम्यान, जर तुम्हाला 12 ऑगस्टला सुट्टी घेता आली तर तुम्ही पाच दिवस सुट्टीवर जाऊ शकता.
जर तुम्हाला दीर्घ सुट्टीवर जायचे असेल तर 16 आणि 17 तारखेला दोन दिवस सुट्टी घ्या, कारण 19 ऑगस्ट आणि 20-21 ला जन्माष्टमी शनिवार-रविवारी असेल.
अशा प्रकारे तुम्ही एकूण 11 दिवस रजेवर जाऊ शकता.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

ऑगस्टच्या या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जन्माष्टमी सण पाहण्यासाठी वृंदावनला जाऊ शकता.
त्याच वेळी, तामिळनाडू, चेरापुंजी, मेघालय, जिम कॉर्बेट, उत्तराखंड, माउंट अबू आणि लडाखचे हवामान देखील या दिवसात खूप सुंदर असते.

 

 सप्टेंबरमधील लाँग वीकेंड (Long weekend in September 2022) –

 

गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आहे. 3 आणि 4 सप्टेंबर शनिवार-रविवार असेल. 1 आणि 2 ला सुट्टी घेता आली तर पाच दिवस फिरायला जाता येईल.
यानंतर 8 सप्टेंबरला ओणम आहे आणि 10-11 शनिवार-रविवार पडेल. यादरम्यान 9 सप्टेंबरला सुट्टी मिळाली तर चार दिवसांचा ट्रीप प्लान करता येईल.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

या सप्टेंबरच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही नैनिताल, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेश सारख्या ठिकाणी जाऊ शकता.

 

ऑक्टोबरमधील लाँग वीकेंड (Long weekend in October 2022)-

 

ऑक्टोबर महिना सणांनी भरलेला असेल. 5 ऑक्टोबरला दसरा आणि 8-9 ऑक्टोबरला शनिवार-रविवार आहे.
गुरुवार-शुक्रवारी सुटी घेतल्यास पाच दिवस सुट्टी मिळेल. यानंतर 22 आणि 23 तारखेला शनिवार-रविवार असेल.
24 तारखेला दिवाळी, 25 तारखेला गोवर्धन पूजा आणि 26 तारखेला भाऊबीज आहे. या दरम्यान तुम्ही दीर्घ सुट्टीसाठी जाऊ शकता.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

ऑक्टोबरच्या या सुट्ट्यांमध्ये तुम्ही नैनिताल, आग्रा आणि वाराणसीसारख्या ठिकाणी जाऊ शकता.

 

नोव्हेंबर-डिसेंबरमधील लाँग वीकेंड (Long weekend in November-December 2022) –

 

वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही लाँग वीकेंड येतील. 3 आणि 4 नोव्हेंबरला शनिवार-रविवार असेल.
तर गुरु नानक जयंती 6 नोव्हेंबरला आहे. 5 नोव्हेंबरला सुट्टी घेतली तर चार दिवस कुठेतरी फिरायला जाता येईल.
24-25 वर्षाच्या शेवटी शनिवार-रविवार येईल. आपण 23 नोव्हेंबर किंवा 26 नोव्हेंबरला सुट्टी घेण्यास सक्षम असाल तर तीन दिवसांसाठी एक लहान ट्रीप प्लान करू शकता.

 

कुठे जायचे (Where to go) –

 

नोव्हेंबर-डिसेंबरच्या या लाँग वीकेंडला तुम्ही ऋषिकेश, मसुरी, आग्रा किंवा जयपूरला जाऊ शकता.

 

Web Title : Long Weekends 2022 | long weekends in 2022 you can plan mini trips during these longest weekends in 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Juhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर, चित्रपटाच्या सेटवरच गरोदरपणा मध्येही…

MVA Government | महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्यातील प्रमुख कामे मार्गी

EPFO | आता PF बॅलन्स जाणून घेणे आणखी सोपे, 2 मिनिटात जाणून घ्या अकाऊंटमध्ये किती आहेत पैसे