MVA Government | महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्यातील प्रमुख कामे मार्गी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) आज (28 नोव्हेंबर) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. महाविकास आघाडी सरकार (MVA Government) हे “आपलं सरकार” आहे हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण करण्यात राज्य सरकारला यश आलं आहे. विविध माध्यम समूहांनी स्वतंत्रपणे केलेल्या सर्वेक्षणांतही हीच बाब अधोरेखित झाली आहे. असे असतानाही भारतीय जनता पक्षाची (BJP) काही विघ्नसंतोषी मंडळी महाविकास आघाडीवर विविध आरोप करण्यातच धन्यता मानत आहेत.

 

कोरोना काळात जनतेची सेवा केली

 

मुळात महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्याही 100 पेक्षा जास्त प्रतिनिधींना सेवेची संधी दिलेली आहे.
अशा वेळी कोरोनाच्या संकटात जनतेची सेवा करायची सोडून भाजपचे हे 100 आमदार पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी गेले होते.
आपल्या शहरातील, आपल्या राज्यातील जनतेला महामारीच्या संकटात सोडून पश्चिम बंगालच्या निवडणुकीला प्राधान्य देणाऱ्या भाजप नेत्यांना महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही.
जेव्हा हे भाजपचे नेते परराज्यात पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त होते तेव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार संपूर्ण समर्पणाने जनतेची सेवा करत होते.

 

भाजपकडून जनतेची फसवणूक

 

महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन केले.
त्याच वेळी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र पीएम केअर्स फंडात (PM Care Fund) पैसे देण्याचे आवाहन केले.
आता मात्र पीएम केअर्स फंड हा सरकारी फंड नसून त्याबद्दल कुठलीही माहिती जनतेला देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने (Central Government) घेतली आहे.
याचाच अर्थ एका अनधिकृत फंडात जनतेचे पैसे लुबाडून या भाजपच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे.
विविध कंपन्यांकडून येणारा CSR फंडही राज्यांच्या खात्यात न टाकता केंद्राच्याच खात्यात टाकावा अशी सोय भाजप सरकारने (BJP Government) केली.

 

केंद्राकडून राज्याला सावत्र वागणूक

 

कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात जास्त असतानाही रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir injection) असो कि कोविड लस (Covid vaccine) असो यात महाराष्ट्राला केंद्र सरकारने सावत्र वागणूक दिली. महाराष्ट्रातील जनतेने हे चित्र अनुभवलं आणि म्हणून नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.

 

सत्ता गेल्याने भाजप नते नैराश्येत

 

सत्तेपासून दूर असल्याने आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावल्यामुळे सध्या भारतीय जनता पक्षातील सगळेच नेते नैराश्यात आहे.
या नैराश्यातूनच भाजपचे नेते महाविकास आघाडीतील नेत्यांवर बेछूट आरोप करत आहेत.
नुकतेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत (ST Workers Strike) घुसखोरी करून भाजपच्या नेत्यांनी संपूर्ण राज्याला वेठीस धरलं. त्याचाही हिशोब जनता नक्कीच करणार आहे.

 

सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार

 

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील कल्याणकारी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत.
सरकार पाडण्याचे जितके प्रयत्न होतील तितकं हे सरकार अधिकाधिक भक्क्कम होणार आहे.
महाविकास आघाडी सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करून पुन्हा सत्तेत येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

 

महाविकास सरकारची 2 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap),
शिवसेनेचे शहरप्रमुख शाम देशपांडे (Shivsena Pune City President Shyam Deshpande) आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh) यांनी ही माहिती दिली.

 

पुणे शहरासाठी महाविकास आघाडी सरकार कडून झालेली प्रमुख कामे

 

1. पुणे जिल्ह्यातील नव्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात 40 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणा.

2. पुण्याच्या रिंगरोड (Pune Ring Road) साठी 26000 कोटींच्या तरतूदीची घोषणा.

3. भाजप सरकारच्या काळात धिम्या गतीने सुरू असणाऱ्या पुणे मेट्रोला (Pune Metro) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळे गती मिळाली

4. 23 गावांचा महापालिकेत समावेश

5. भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण केला.

6. PMRDA ने पुणे जिल्ह्याचा डी. पी केला.

 

Web Title : MVA Government | Major development works in Pune during the period of Mahavikas Aghadi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | आता PF बॅलन्स जाणून घेणे आणखी सोपे, 2 मिनिटात जाणून घ्या अकाऊंटमध्ये किती आहेत पैसे

Pune Crime | वाहन चाेरट्याकडून दोन गाड्या हस्तगत; डेक्कन पोलिसांची कामगिरी

Maharashtra Rains | पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसणार, मराठवाड्याला ‘अवकाळी’चा इशारा