लोणी काळभोर येथे हाॅटेल व्यावसायिकास मारहाण

थेऊर,पोलीसनामा ऑनलाइन – लोणी काळभोर येथील एम आयटी काॅर्नरवरील एका हाॅटेल व्यावसायिकास बिलाचे पैसे जास्त घेतो म्हणून दमदाटी करत मारहाण केल्या प्रकरणी तिघांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार,एम आय टी काॅर्नरवरील कॅफे मेलोना चे चालक सफवान आशरफ मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारी नुसार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मावसभाऊ सोहेलसह आपल्या हाॅटेलमध्ये असताना सोनु चौधरी नावाचा व्यक्ती हाॅटेलमध्ये येऊन हुक्का फ्लेवर कोकची मागणी केली त्यावर त्यासाठी तीनशे रुपयाची मागणी सोहेल यांनी केली त्यावर सोनूने यासाठी इतर ठिकाणी केवळ दोनशे रुपयात मिळत असल्याचे सांगून तुम्ही महाग विकता आहात म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यावर सफराज यांनी तेथे समजवण्याचा प्रयत्न केला असता सोनूने तेथील एक स्टूल उचलून त्याच्या डोक्यात मारला परंतु त्यांनी तो हुकवला परंतु तो हातावर लागला त्यात त्याचे हाड फ्रॅक्चर झाले.यादरम्यान बाहेर चारचाकी गाडीत बसलेले इतर दोन साथीदार हाॅस्पिटलमध्ये येऊन सोहेल फाहद व सफवान यांना मारहाण केली व परत जाताना दमदाटी करत तुम्हाला बघून घेईन असे सुनावले.त्यानंतर सफवान यांनी लोणी काळभोर पोलिसांना याची माहिती दिली यावर पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.

You might also like