Love is Blind | 3 लेकरांची आई असलेल्या काकीचं भाच्यावर जडलं ‘प्रेम’, ‘मज्जा’ करण्यासाठी गेली पळून पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाप्रेम (love) प्रकरणातील एक अजब घटना झारखंडमधून समोर आली आहे. आपल्या 3 लेकरांना सोडून काकी भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला अन् पोलिसांनी दोघांनाही पकडल. पकडल्यानंतर काकीने पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र कुटुंब अन् गावकऱ्याच्या भितीने भाच्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या काकीने त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाच्यानेच आपल्याला पळून नेल्याचे म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, झारखंडच्या बाजीतपूर गावात राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचे तिच्या 25 वर्षीय भाच्यासोबत प्रेमसंबध होते. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांचे प्रेम love प्रकरण सुरु होते. सदर महिलेला 3 लहान मुल आहेत. एक आठवड्यापूर्वी हे दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेच्या पतीने पोलीसात याची तक्रार दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने या दोघांची माहिती मिळवली. काकी अन् तिचा भाचा हे दोघेही जमालपूरमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी तिथून दोघांनाही ताब्यात घेऊन समजावून घरी आणलं. घरी आल्यानंतर महिला पतीला सोडून भाच्यासोबत लग्नासाठी हट्ट धरला. तिने आपल्या प्रेम love प्रकरणाची कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र नातेवाईक अन् गावकऱ्यांच्या भीतीमुळे भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच काकीसोबत कोणतेही संबंध नसल्याचे सांगतिले. त्यामुळे संतप्त झालेल्या काकीने भाच्यावरच फसवणुकीचा अन् लैगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Also Read This : 

अहमदनगर ! काय सांगता ! होय, पोलिस कर्मचार्‍यानं सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा केला प्रयत्न, अन्…

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Cryptocurrency Price Today : आज कोणते चलन तुम्हाला बनवणार ‘मालामाल’, ‘इथं’ तपासा संपुर्ण यादी

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

Income Tax विभाग आज लाँच करणार नवीन वेबसाइट, टॅक्सपेयर्सला मिळतील ‘या’ सुविधा; जाणून घ्या