Love Relationship | तुमच्या प्रेमाला प्रभावित करायचंय? तर ‘या’ सवयींपासून लांब रहा; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Love Relationship | म्हणतात ना ‘प्रेम हे आंधळं असतं’..’प्रेमाला कोण रोखणार’..अनेकजण अशा प्रेमातून रिलेशनशिपच्या (Love Relationship) बंधणात अडकले जातात. प्रेमाचं नातं घट्ट करत असतात. मात्र दुसरीकडे अनेकजण सिंगल असतात. आपल्यालाही एक बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेन्ड (Boyfriend or girlfriend) असावी. असही त्यांना वाटत असतं. पण करणार काय? काहीना काही प्रसंग अथवा समस्या बहुतेक तर आपल्या स्वभावात वा देखाव्यात अडचण निर्माण ठरत असते. स्पर्धेचं जसं युग आहे तसंच युग आता प्रेमाच्या मिलनात येताना दिसत आहेत. तर एखाद्या मुलीचं ह्रदय जिंकायचं असेल तर काय करावं लागणार? हे अनेकांना कळतं तर काहींना कळत नाही.

प्रत्येकाला किंवा प्रत्येकीलाच वाटतं की आपणही रिलेशनशिपमध्ये (Love relationship) असावं, आपल्यालाही एक बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेन्ड असावी. सिंगल असण्यामागे कदाचित आपल्या काही सवयी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या सवयींमुळे आपली क्रश आणि अन्य कोणतीच मुलगी आपल्याकडे आकर्षित होत नसेल. मुलींना मुलांच्या काही सवयी आवडत नाहीत. या पार्श्वभुमीवर काही सवयींपासून मुलांनी किॆबहुना तरुणांनी लांब रहाने आवश्यक आहे. जाणून घ्या सविस्तर.

1. दारू आणि सिगारेटचे व्यसन –

अलिकडच्या काळात मुलं ही मोठ्या प्रमाणावर व्यसनांत बुडाले आहेत.
सिगारेटचे व्यसन आणि दारू या गोष्टी अनेकांमध्ये सामान्य बाब होत चालली आहे.
पण बहुतांश मुलींना या गोष्टींचा तिरस्कार होतो. चिड येते. व्यसनी मुलांपासून मुलींना शक्यतो लांब राहणे आवडते. त्यामुळे ही सवय सोडायला हवी.

2. भांडखोर, चिडखोर –

अनेक मुले सातत्याने भांडणं काढतात, मारामाऱ्या करतात, जाता-येता शिव्या कुणालाही शिव्या देतात, दादागिरी करतात.
समाजाला उपद्रवकारक ठरणाऱ्या गोष्टींमध्ये अधिकाधिक सहभागी होत असतात.
मात्र, कोणत्याही सभ्य मुलीला ही गोष्ट आवडत नाही.
त्यामुळे आपण जर भांडखोर आणि चिडखोर असाल तर ही सवय बदलावी लागेल.

 

3. शिव्या देणारे, अपमानजनक बोलणारे –

जी मुलं वारंवार अपशब्द वापरतात, शिव्या देतात, काहीही घाणेरडं बोलत राहतात अशा मुलांपासून मुली या दूरच राहणं पसंत करतात.
एखाद्याच्या वयाचा विचार न करता जर कोणी त्याला अपमानजनक बोलत असेल किंवी आक्षेपार्ह भाषा वापरत असेल तर अशा मुलांपासून मुली लांब राहतात.

4. खोटारड्या मुलांपासून मुलींचा दुरावा –

खोटं बोलणं हे कुणाही मुलीला किंवा महिलेला आवडत नाही. मग मुलगा खोटं बोलतोय म्हणून मुली रिलेशनशीप स्टाॅप करण्याकडे कल राहतो.
तुम्ही कुठे आहात किंवा कोणासोबत आहात याबाबत जर मुलींना खोटं सांगितलं तर मग सर्व समाप्तच. त्याचबरोबर तुम्ही कोणता जॉब करता.
तुमच्या कुटुंबाची पार्श्वभू्मी काय तसेच तुमचा भूतकाळ कसा आहे या गोष्टींची सत्य माहिती मुलींना हवी असते.
याबाबत असत्य माहिती आढळून आल्यास तुंंमचं प्रेमसंबध धोक्यात येऊ शकते.
त्यामुळे अशा बारीकसारीक बाबी तुम्ही स्वत:पासून लांब करु शकता.

 

Web Title :  Love Relationship | want to impress your crush then stay away from these habits, know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMC Medical College | नॅशनल मेडिकल कमिशनकडून (NMC) पुणे मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी

Chandrapur Crime | अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र, 22 बेरोजगारांची 1 कोटींची फसवणूक