PMC Medical College | नॅशनल मेडिकल कमिशनकडून (NMC) पुणे मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन PMC Medical College | पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College ) केंद्र सरकारच्या एनएमसी (NMC) अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनने आज (गुरुवार) मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा (PMC Medical College) मार्ग मोकळा झाला असून लवकरच नायडू रुग्णालयाच्या (Naidu Hospital) जागेवर इमारत उभारुन रुग्णालय सुरु करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी दिली.

 

 

महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (PMC Medical College) सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या.
वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.
अखेर याला यश आले असून लवकरच महाविद्यालय सुरु होणार आहे.

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला आज नॅशनल मेडिकल कमिशनने (National Medical Commission) आज परवानगी दिली.
यामुळे यावर्षी डिसेंबर पासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
वैद्यकीय माहाविद्यालयाच्या डीनची नियुक्ती (dean post) करण्यात आली असून टीचिंग स्टाफच्या मुलाखती (Teaching staff interview) झाल्या आहेत. अन्य स्टाफची लवकरच भरती होईल.
सध्या सणस शाळेत वर्ग व कमला नेहरू रुग्णालयात (Kamala Nehru Hospital) प्रात्यक्षिकाची सोय करण्यात आली आहे.
लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारून रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि विक्रम कुमार यांनी दिली.

 

पुणे महापालिकेचे हे पहिलेच मेडिकल कॉलेज व रुग्णालय आहे.
हे कॉलेज अहमदाबादच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालच्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून महापालिकेचे पदाधिकारी व गटनेते या ट्रस्टमध्ये असणार आहे.
कॉलेज चालवण्याचा सगळा खर्च कमीत कमी होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
हे कॉलेज चालवण्यासाठी साधरण दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

Web Title : PMC Medical College | National Medical Commission (NMC) gives permission to Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College of Pune Corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMC Worker 7th Pay Commission | पुणे महापालिकेतील 15 हजार कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू, येत्या दोन-चार दिवसात ‘जीआर’ काढणार

Chandrapur Crime | अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र, 22 बेरोजगारांची 1 कोटींची फसवणूक