Lower Abdomen Rash | पोटाच्या खालील भागात रॅशेस येतात का?, जाणून घ्या कारण आणि ५ घरगुती उपाय

नवी दिल्ली : Lower Abdomen Rash | काही लोकांना पोटाच्या खालच्या भागात रॅशेस येण्याची समस्या असते. यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य कारण म्हणजे बॅक्टेरियल किंवा (Bacterial) फंगल इन्फेक्शन (Fungal Infection). स्वच्छतेच्या अभावामुळे देखील रॅशेस उठतात. यावरील घरगुती उपाय जाणून घेऊया. (Lower Abdomen Rash)

१. ओटमीलने रॅशेसवर उपचार – Use Oatmeal For Rashes Treatment
ओटमील बारीक पावडर बनवा. कोमट पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट रॅशेसवर लावा. कोरडी झाल्यानंतर, त्वचा स्वच्छ करा. दिवसातून एकदा हा उपाय केल्याने रॅशेस लवकर बरे होतात.

२. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावा – Use Apple Cider Vinegar For Rashes
एक चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळा. या मिश्रणात कापूस भिजवून रॅशेसवर लावा. मिश्रण त्वचेवर सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवा. (Lower Abdomen Rash)

३. टी ट्री ऑईल वापरा – Use Tea Tree Oil For Rashes
टी ट्री ऑईलचे २ ते ३ थेंब खोबरेल तेलात मिसळा. पोटाखालील रॅशेसवर लावा. तेल रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

४. रॅशेसवर एलोवेरा लावा – Use Aloe Vera For Rashes
रॅशेस आलेल्या त्वचेवर एलोवेरा जेल लावा. जेल त्वचेवर ३० मिनिटे ठेवा. यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.

५. मधाने करा रॅशेसवर उपचार – Use Honey For Rashes Treatment
रॅशेस आलेल्या त्वचेवर मध लावा. तासभर तसेच राहू द्या. नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करा. हा घरगुती उपाय दिवसातून एकदा करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे