Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मांस विक्रीच्या दुकानात (Meat Shop) तपासणीसाठी गेलेल्या पोलीस (Pune Police) अधिकारी, मनपा आरोग्य निरीक्षक (Municipal Health Inspector) आणि पशु वैद्यकीय अधिकारी (Animal Medical Officer) यांच्यावर दबाव टाकणाऱ्या 30-40 जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग (Restraining Order) केल्या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) रविवारी (दि.20) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास येरवडा येथील लक्ष्मीनगर येथे घडला आहे.

याबाबत येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) पोलीस उपनिरीक्षक विशाल ज्ञानेश्वर पाटील (PSI Vishal Dnyaneshwar Patil) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 30 ते 40 जणांवर आयपीसी 143, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लक्ष्मीनगर येथील शैबाज सादीक कुरेशी यांच्या मटणाच्या दुकानासमोर घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या एका मांस विक्रीच्या दुकानात गोमांस विक्री होत असल्याची तक्रार एमडीटी डिव्हाईसवर (MDT Device) पोलिसांना प्राप्त झाली.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक कांचन जाधव (PI Kanchan Jadhav), महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक,
पशु वैद्यकीय अधिकारी आणि फिर्य़ादी येरवड्यातील शैबाज सादिक कुरेशी यांच्या दुकानासमोर गेले.
त्यावेळी परिसरात 30 ते 40 जणांनी पोलीस उपायुक्त विशेष शाखा (DCP Special Branch)
यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लिंगे (PSI Linge) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा ! वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने 125 वॉर्डनची नियुक्ती करा!

पुण्यातील फार्म हाऊसवर सापडले बिबट्याचे अवयव, दोन बड्या उद्योजकांवर FIR

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक, 1 कोटी 16 लाखांचे अफीम जप्त

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

भररस्त्यात तरुणीची छेड काढून मारहाण, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR; पुण्यातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे