LPG Cylinder : घरबसल्या ‘या’ पध्दतीनं तपासा सबसिडी जमा होतेय की नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही एलपीजीवर सबसिडी घेत आहात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकार एका वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिलिंडरवर सबसिडी देते. यापेक्षा जास्त सिलिंडर खरेदी करण्यासाठी बाजारभावाने पैसे द्यावे लागतात. अनेक लोकांना माहीत नसते की, त्यांच्या खात्यात सबसिडी जमा होत आहे किंवा नाही. घरबसल्या हे कसे जाणून घ्यायचे याची सविस्तर माहिती घेऊयात.

असे जाणून घ्या सबसिडीच्या रकमेविषयी

* सर्वप्रथम Mylpg.in वेबसाइटवर जा. येथे तिनही पेट्रोलियम कंपन्यांच्या (एचपी, भारत आणि इण्डेन) लोगोचे टॅब दिसतील. आपल्या सिलिंडरच्या कंपनीवर क्लिक करा.

* नवीन पेज उघडेल, ज्यावर बार मेन्यूमध्ये जा आणि आपला 17 अंकांचा एलपीजी आयडी नोंद करा. जर एलपीजी आयडी माहीत नसेल, तर क्लिक हिअर टू नो यूअर एलपीजी आयडीवर क्लिक करा, तिथे सांगितलेल्या स्टेप पूर्ण केल्यानंतर तो समजू शकतो.

* येथे आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, एलपीजी ग्राहक आयडी, राज्याचे नाव, वितरकाची माहिती नोंदवा. कॅप्चाकोड नोंदवल्यानंतर प्रोसेस बटनवर क्लिक करा. जे नवीन पेज उघडेल, त्यावर तुमचा एलपीजी आयडी स्पष्ट दिसला पाहिजे.

* एका पॉप-अपवर तुमच्या खात्याची माहिती दिसून येईल. येथे बँक खाते आणि आधार एलपीजी खात्याशी लिंक केले किंवा नाही हे सांगितले जाईल. सोबतच हीसुद्धा मााहिती मिळेल की, तुम्ही सबसिडीचा पर्याय सोडला आहे किंवा नाही.

* पेजच्या डावीकडे सिलिंडर बुकिंग हिस्ट्री / सबसिडी ट्रान्सफर पाहा वर क्लिक करा. येथे तुम्ही सबसिडी रक्कम पाहू शकता. येथे मागील महिन्यात मागवलेला सिलिंडर आणि त्याबदल्यात तुमच्या खात्यात जमा झालेली सबसिडीची रक्कम दिसून येईल. एकदा लॉग इन केल्यानंतर सबसिडीबाबत जाणून घेणे सोपे जाते.

गॅस बुकिंगवर असे मिळवा एक्स्ट्रा कॅशबॅक

* यासाठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी अ‍ॅमेझॉनवरून एलपीजी सिलिंडर बुकिंग करावा लागेल.

* प्रथम अ‍ॅमेझॉन मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा. नंतर पे ऑपशनमध्ये जा आणि आणि बिल पेमेंट ऑपशनवर क्लिक करा.

* आता गॅस सिलिंडर ऑपशन निवडा, आपरेटर म्हणजेच गॅसची कंपनी निवडा.

* एचपी, इंडियन गॅस किंवा भारत पेट्रोलियम गॅसच्या ब्रँडवर कॅशबॅक मिळत आहे.

* आता एलपीजी आयडी किंवा रजिस्टर मोबाइल नंबर टाका. यानंतर बुकिंग डिटेल्स येईल. आणि 50 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक सरकारच्या मिळणार्‍या सबसिडीव्यतिरिक्त असेल.

1 डिसेंबरपर्यंत ऑफर
ही ऑफर केवळ 1 डिसेंबरपर्यंत आहे. तुम्हाला स्कीमचा लाभ या अगोदर घ्यावा लागेल. कोणत्याही माध्यमातून पेमेंट केल्यास तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. किंवा डिस्ट्रीब्यूटरद्वारे ग्राहकाला बुकिंग आयडी पाठवला जाईल. नंतर कॅशबॅक मिळेल. मात्र, सिलिंडरची डिलिव्हरी होण्यास 3 दिवसांचा वेळ लागतो. अशावेळी तुम्हाला स्टॉक संपण्यापूर्वी 3-4 दिवस अगोदर बुकिंग करावे लागेल.