LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येणार पैसे?

नवी दिल्ली : LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या सबसिडी (LPG cylinder Subsidy) बाबत मोठी माहिती समोर येत आहे. सरकारच्या एका अंतर्गत मुल्यांकनात (Internal Assessment) संकेत मिळत आहेत की, एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रति सिलेंडर 1,000 रुपये भरावे लागू शकतात. मात्र, यावर सरकारचा काय विचार आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

CNBC-TV18 च्या वृत्तानुसार, सरकारने सबसिडीच्या मुद्द्यावर अनेकदा चर्चा केली आहे परंतु अजूनपर्यंत कोणतीही योजना बनवलेली नाही. सूत्रांनुसार, एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) बाबत सरकार दोन मार्ग अवलंबू शकते. पहिला हा की विना सबसिडीच्या सिलेंडरचा पुरवठा करणे. दुसरा हा की निवडक ग्राहकांनाच सबसिडीचा लाभ दिला जावा. मात्र, सबसिडी देण्याबाबत अजूनपर्यंत काहीही स्पष्ट नाही.

सबसिडीची स्थिती काय आहे?

सध्या सरकारने जवळपास सिलेंडरची सबसिडी बंद केल्यासारखीच आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन केले होते, त्यावेळी कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. यामुळे भारत सरकारला एलपीजी सबसिडी (LPG Subsidy) च्या बाबतीत मदत मिळाली कारण किमती कमी होत्या आणि सबसिडीबाबत बदलाची आवश्यकता नव्हती. मे 2020 पासून, अनेक क्षेत्रात एलपीजी सबसिडी बंद झाली आहे.

सरकारचा प्लान काय आहे?

सरकार सबसिडीबाबत विचार करू शकते, परंतु हे स्पष्ट आहे की, 10 लाख रुपये इन्कमचा नियम लागू ठेवला जाईल आणि उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ मिळेल.
उर्वरित लोकांसाठी सबसिडी बंद होऊ शकते.

हे देखील वाचा

Pegasus | पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी SC स्थापन करणार तज्ज्ञांची समिती

Pune Crime | पुण्यातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, खडक, समर्थ, लष्कर, वानवडी आणि कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायट्यांत 11 चोर्‍या; घरकाम करणार्‍या महिलेकडून 61 लाखाचा माल जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LPG Cylinder Subsidy | lpg consumers ready to pay rs 1000 per cylinder govt no clarity on subsidy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update