LPG Cylinder : गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी वाढला ‘वेटिंग पीरियड’, आता 1 दिवसाऐवजी इतके दिवस करावी लागेल प्रतिक्षा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुढील काही दिवसात तुम्हाला एलपीजी सिलेंडरसाठी जास्त वाट पहावी लागू शकते. याचे सर्वात मोठे कारण व्हेंडर्स मोठ्या संख्येने संक्रमित होणे हे आहे. मागील 20 दिवसात डिलिव्हरी वेटिंग पीरियड एका दिवसावरून तीन दिवसापर्यंत वाढला आहे. संसर्गाची प्रकरणे पाहता येत्या काही दिवसात वेटिंग पीरियड आणखी वाढण्याची शक्यता आहे.

20 टक्के डिलिव्हरी मॅन झाले संक्रमित
रिपोटनुसार, 20 टक्केपेक्षा जास्त डिलिव्हरी मॅन कोरोना संक्रमित आढळले आहेत. 2020 मध्ये अवघे 5 टक्के डिलिव्हरी मॅन कोरोनाने संक्रमित झाले होते.

आणखी वाढू शकतो वेटिंग पीरियड
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशात आतापर्यंत 18 टक्के डिलिव्हरी मॅनचे स्थलांतर झाले आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसात वेटिंग पीरियड आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून जास्त प्रभावित परिसरात 4-5 दिवस वेटिंग वाढू शकते.

सिलेंडर बुकिंगमध्ये सुद्धा घट
वाढत्या कोरोनामुळे देशात लागू लॉकडाऊनमुळे सिलेंडर बुकिंगमध्ये सुद्धा घट झाली आहे. एप्रिलमध्ये कमर्शियल सिलेंडर बुकिंग 80 टक्के कमी झाले आहे. तर डोमेस्टिक एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमध्ये 25 टक्के घट झाली आहे. उज्जवला कस्टमर मंथली बुकिंग कमी होऊन 20-25 टक्के झाली आहे.

बदलणार आहे बुकिंगची पद्धत
सिलेंडरच्या बुकिंगबाबत मागील वषी 1 नोव्हेंबर 2020 पासून काही बदल लागू झाले होते. ज्यामध्ये गॅस सिलेंडरची बुकिंग ओटीपी बेस्ड केली होती. जेणेकरून बुकिंग सिस्टम जास्त सुरक्षित आणि चांगली व्हावी. आता पुन्हा एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरी सिस्टम आणखी सोपी करण्याची तयारी केली जात आहे.