LPG Gas Cylinder Price | केंद्राकडून गृहिणींना रक्षाबंधनचे खास गिफ्ट; घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त

पोलीसनामा ऑनलाइन – LPG Gas Cylinder Price | महागाईच्या आगीमध्ये होरपळून निघणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. महागाईमुळे, भाजीपाला, गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Price) अशा सर्वच गोष्टींच्या किंमतींनी गगनभरारी घेतली आहे. आता मात्र गृहिणींना दिलासा मिळणार असून केंद्र सरकारतर्फे (Central Government) गॅस सिलेंडरवरील सबसिडी (Gas Cylinder Subsidies) मंजूर करण्यात येणार आहे. या सबसिडीमुळे घरगुती वापराचा गॅस 200 रुपयांनी स्वस्त (LPG Gas Cylinder Price) होणार आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सर्व गृहिणी भगिनींसाठी ही आनंदवार्ता मिळाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारतर्फे (Modi Government) महागाई कमी करण्याचे प्रयत्न चालू झाले असल्याचे दिसून येत आहे.

देशामध्ये घरगुती वापराच्या 14.2 किलो एलपीजी गॅसवर केंद्र सरकारकडून सबसिडी देण्यात येणार आहे. यामुळे गॅसच्या किंमती कमी होणार आहेत. सध्या देशामध्ये हा घरगुती वापराचा गॅस 1200 ते 1300 रुपयांना मिळत आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अखेरचा बदल 1 मार्च 2023 रोजी करण्यात आला होता. आता परत एकदा बदल करुन किंमती कमी करण्यात येणार आहेत. या नव्या सबसिडीमुळे घरगुती वापराचा गॅस 1 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) येणाऱ्या ग्राहकांना या
सबसिडीचा फायदा होणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत दोनशे
रुपयांनी स्वस्त (LPG Gas Cylinder Price) होणार आहे. सध्या दिल्लीमध्ये (Delhi) एलपीजी गॅसची किंमत 1 हजार 103
रुपये आहे तर मुंबईमध्ये 1 हजार 52 रुपये आहे. एलपीजी गॅसच्या दरामध्ये करण्यात येणाऱ्या या कपातीमुळे
सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक आनंद व्यक्त करत असून ही गृहिणींसाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे.
1 ऑगस्ट रोजी 19.2 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत (Commercial Cylinder Prices) बदल होऊन
त्याची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती. तर तेल विपणन कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला
प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ केली असताना मे महिन्यात कंपन्यांनी दोनदा किंमतीत वाढ केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mahavitaran News | खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा ! औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये 40 हजार वीजग्राहकांना मनस्ताप