Lpg Gas Price : आता दर आठवड्याला LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार बदल ! जाणून घ्या पूर्ण प्रकरण…

नवी दिल्ली : तेल कंपन्या आता दर आठवड्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतीचे पुनरावलोकन करतील. यामध्ये सिलेंडरची किंमत कमी करणे किंवा वाढवण्यावर निर्णय घेतला जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या यासाठी तयारी करत आहेत. सोबतच वितरक सुद्धा आपल्या स्तरावर तयारी करत आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी एलपीजी सिलेंडरची किंमत महिन्यातून एकदा ठरवली जात होती. तेल कंपन्यांच्या अधिकार्‍यांनुसार, ही तरतूद कंपनीला होत असलेला तोटा कमी करण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. मागील महिन्यात गॅसची किंमत कमी झाली तर, संपूर्ण महिन्यापर्यंत कंपनीला नुकसान सोसावे लागत होते, परंतु नव्या व्यवस्थेत एक आठवड्यानंतरच त्यावर नियंत्रण करता येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, या महिन्यात दोन वेळा एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत, तर याचे पुनरावलोकन मंगळवारी झाले आहे. हे पाहता एलपीजीच्या वितरकांचे म्हणणे आहे की, प्रत्येक आठवड्यात सिलेंडरच्या किमतीत बदल होईल. यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

याबाबत तेल कंपन्यांच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात अजूनपर्यंत अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. परंतु एजन्सीचे संचालक नवीन तरतूदींबाबत सतत फोन करत आहेत.