LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल? जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

नवी दिल्ली : LPG Subsidy | एलपीजीवर सबसिडी घेणार्‍यांसाठी मोठी बातमी आहे. उज्ज्वला स्कीम (Ujjwala scheme) अंतर्गत फ्री एलपीजी गॅस कनेक्शनवर मिळणार्‍या सबसिडीमध्ये (LPG Subsidy) मोठा बदल होऊ शकतो.

LPG कनेक्शनवर बदलणार सबसिडी स्ट्रक्चर?

moneycontrol मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, स्कीमअंतर्गत नवीन कनेक्शनसाठी सबसिडीच्या (free LPG connection) सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो. सूत्रांनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने दोन नवीन स्ट्रक्चरवर काम सुरू केले आहे आणि ते लवकर जारी केले जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेटमध्ये एक कोटी नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केली होती. परंतु आता सरकार OMCs कडून अ‍ॅडव्हान्स पेमेंट मॉडलमध्ये बदल करू शकते.

अ‍ॅडव्हान्स पेमेंटची पद्धत बदलणार?

मनी कंट्रोलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1600 रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट कंपनी एकरक्कमी वसूल करेल. सध्या OMCs अ‍ॅडव्हान्स रक्कम EMI च्या रूपात वसू करते तर या बाबतची माहिती असलेल्या सूत्रांनुसार, स्कीममध्ये उर्वरित 1600 ची सबसिडी सरकार देते.

सरकार देते फ्री LPG सिलेंडर

सरकारच्या Ujjwala scheme मध्ये ग्राहकांना 14.2 किलोचा सिलेंडर आणि स्टोव्ह दिला जातो.
याचा खर्च सुमारे 3200 रुपये असतो आणि यावर सरकारकडून 1600 रुपये सबसिडी मिळते तर 1600 रुपये तेल मार्केटिंग कंपन्या (OMCs) अ‍ॅडव्हान्सच्या रूपात देतात. मात्र OMCs रिफिल केल्यास सबसिडीची रक्कम EMI च्या रूपात वसूल केली जाते.

असे करा Ujjwala scheme मध्ये रजिस्ट्रेशन

– उज्ज्वला योजनेचे अधिकृत पोर्टल pmuy.gov.in वर जा.

– यानंतर Apply For New Ujjwala 2.0 Connection वर क्लिक करा.

– पेजवर तीन ऑपशन (इण्डेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी) दिसतील.

–  सोयीनुसार एक पर्याय निवडा.

– मागितलेली सर्व माहिती भरा.

–  कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन जारी केले जाईल.

हे देखील वाचा

PM Modi यांचा US दौरा ! अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती, पीएम मोदींनी मानले आभार, प्रोटोकॉल तोडून भारतीयांना देखील भेटले

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : LPG Subsidy | lpg subsidy new rule for subsidy may be announced for free lpg connection know here detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update