Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

पुणे / पिंपरी : Pune Crime | मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाल्यानंतर त्याने घरी येऊन लग्नाची मागणी घातली. तिचा विश्वास संपादन करुन तो १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. चिखली मध्ये ही घटना घडली (Pune Crime) आहे.

याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण कालीदास पाटील (वय ४०, रा. विशालनगर, सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची संगम डॉट कॉम या सोशल मॅट्रीमोनी साईटवर १८ जुलै २०२१ रोजी ओळख झाली. त्यानंतर २७ जुलै रोजी आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ४ तोळ्याचे गंठण, २ तोळ्याची अंगठी, ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मुंडकर अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

PM Kisan | आयटीआर फाईल करणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतात का ‘पीएम-किसान’चे 6 हजार? जाणून घ्या

UPSC Exam | ‘सारथी’ संस्थेच्या 21 विद्यार्थ्यांचे UPSC परीक्षेत घवघवीत यश

Ajit Pawar | ‘…कशी तुझी जिरवली आता भर 100 चं’, अजित पवारांची फटकेबाजी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | cheating of 1.70 lakh news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update