पिवळ्या साडीतील ‘त्या’ पोलिंग ऑफिसरचा ‘ग्लॅमरस’ लुक पुन्हा चर्चेत (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका 2019 दरम्यान पिवळ्या रंगाच्या साडीसह एका पोलिंग ऑफिसरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. रीना द्विवेदी नावाच्या मतदान अधिकारी त्यांच्या ग्लॅमरमुळे एका रात्रीत फेसबुक ते व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसिद्ध झाल्या होत्या.

निवडणुकांदरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रिना द्विवेदी या आपल्या सहकारी अधिकाऱ्यासोबत हातात ईव्हीएम घेऊन जात आहे. त्यावेळी या फोटोची चर्चा खुप झाली होती. आता पुन्हा त्या काही फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत.

पुन्हा एकदा पिवळ्या रंगाच्या साडीवर असलेल्या एका महिला पोलिंग ऑफिसरच्या फोटोने सोशल मीडियावर धमाल केली आहे. निवडणूक ड्यूटीदरम्यान पिवळ्या रंगाची साडी असलेली महिला पोलिंग ऑफिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊच्या रीना द्विवेदींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ते अंदमान आणि निकोबार बेटांवरील आहेत.

रीना द्विवेदी एका एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या की, ‘हा फोटो माझाच आहे’. रीना द्विवेदी या लखनऊमध्ये पीडब्ल्यूडी विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करतात.

रीना म्हणाल्या की, ‘लहानपणापासूनच त्यांना स्वत: ला फिट ठेवण्याची आवड होती. त्यांना फोटो सेशन करायला आवडते’. रीना यांनी ड्रेसबद्दल सांगितले की, ‘ड्रेस कोड काळजीपूर्वक निवडा जेणेकरुन आपण सुंदर दिसू’.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like