‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’, पोलिसांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊ पोलिसांचे सोशल मीडियावर असलेलं प्रेम कमी व्हायचे नाव घेत नाहीये. यामुळे काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या टिक टॉक व्हिडिओनंतर आता पुन्हा एकदा साउथ सिटी पोलीस चौकीतील कर्मचारी मोहम्मद आरिफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या त्यांचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले असून एकामध्ये ये पुलिस स्टेशन है जब तक बैठने को न कहा जाए, बैठो नहीं, ये तुम्हारे बाप का घर नहीं है. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो पुलिस वालों से न दोस्ती अच्छी, न दुश्मनी. त्याचबरोबर त्यांनी मागे बंदूक देखील ठेवली आहे.

'ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नहीं', Tik Tok वीड‍ियो वायरल
मात्र सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून हा व्हिडीओ म्युझिकली ऍपवर बनवण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ जवळपास वर्षभर जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या देखील लखनऊ पोलिसांच्या सोशल मीडिया साईट्सवर दोन व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये लखनऊ बीकेटी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा कर्मचारी जोगेंद्र हा एका मुलीबरोबर व्हिडीओ बनवताना दिसून येत आहे. तर कधी तो या व्हिडिओत तो पोलिसांच्या गाडीवर नाचताना दिसून येत आहे.

'ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नहीं', Tik Tok वीड‍ियो वायरल
त्यामुळे लखनऊ पोलिसांचा हा अनोखा अंदाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ऑनड्युटी असणारे हे कर्मचारी स्वतःचा वेळ टिक- टॉक व्हिडीओ तयार करण्यात खर्च करत आहेत.  त्यामुळे पोलिसांच्या वर्दीतच व्हिडीओ तयार केले जात असल्याने लखनऊ पोलिस सध्या सगळीकडे टीकेचे धनी होत आहेत.

'ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नहीं', Tik Tok वीड‍ियो वायरल
दरम्यान, याप्रकारचे व्हिडीओ आधीही व्हायरल झाले होते. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना दरडावून सोडले होते. मात्र त्यांनी यावेळी देखील कुणालाही न जुमानता व्हिडीओ तयार केले आहेत. त्यामुळे यावेळी दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लखनऊ पोलीस अधीक्षक कलानिधि नैथानी यांनी दिली आहे.

You might also like