Lumpy Skin Disease Virus | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आता जनावरांनाही क्वारंटाईन करणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Lumpy Skin Disease Virus | देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरु लागला आहे. राज्यातील खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन (Livestock) विशेषत: गाई आणि काही प्रमाणात म्हशी या लम्पी रोगाला बळी पडत आहेत. देशातील 12 राज्यात जवळपास 165 जिल्ह्यातील 11.25 लाख गाई-म्हशींना या रोगाचा (Lumpy Skin Disease Virus) प्रादुर्भाव झाला आहे. तर आतापर्यंत 50 हजार जनावारांचा मृत्यू झाला आहे.

 

औरंगाबाद मध्ये 32 जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुदैवाने अद्याप एकाही जनावाराचा मृत्यू झाला नाही. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर (Quarantine Center for Animals) सुरु करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिकारी (Collector) यांना दिल्या आहेत.

 

एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लम्पी रोगाबाबत उपाय योजनेविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, लम्पी आजारावर लस उपलब्ध (Vaccine Available) केली आहे.
लम्पी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांची जनवारे मृत्यूमुखी पडली आहेत त्यांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषाप्रमाणे मदत राज्य सरकार करेल.
तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

 

Web Title :- Lumpy Skin Disease Virus | cm eknath shinde has given instructions to start a quarantine center for animals due to lumpy skin disease virus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘हॅलो चंद्रकांतदादा…’ भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

 

Vedanta-Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे भूमिपूजन कधी झाले, फोटो दाखवा, आशिष शेलारांचे शिवसेनेला चॅलेंज

 

Bad Cholesterol | ‘या’ गोष्टी जलद वाढवतात कोलेस्ट्रॉल, आजपासूनच सोडून द्या अन्यथा येऊ शकतो हार्ट अटॅक!