Bad Cholesterol | ‘या’ गोष्टी जलद वाढवतात कोलेस्ट्रॉल, आजपासूनच सोडून द्या अन्यथा येऊ शकतो हार्ट अटॅक!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bad Cholesterol | आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या भेडसावत आहे. ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार (Heart Disease) आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता लक्षणीय वाढते. तज्ज्ञांच्या मते कोलेस्ट्रॉल वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आज आम्ही अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढते. चांगल्या आरोग्यासाठी या गोष्टी टाळाव्यात. (Bad Cholesterol)

 

अनेकांना तळलेले पदार्थ आवडतात. पण हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तेलकट पदार्थांमुळे ऊर्जेची घनता आणि कॅलरीचे प्रमाण वाढते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. याशिवाय तेलकट पदार्थांमुळे हार्ट अटॅक, लठ्ठपणा आणि डायबिटीजचा धोका (Heart Attack, Obesity, Diabetes) वाढतो.

 

ज्या लोकांना केक, ब्राउनी आणि आईस्क्रीम खाणे आवडते, त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट, साखर आणि इतर रिफाईंड कार्ब असतात. ते शरीरात ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. (Bad Cholesterol)

सॉसेज, बेकन आणि इतर प्रक्रिया केलेले मांस देखील टाळावे. या गोष्टी शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवतात.
ते तयार करण्यासाठी जास्त फॅट असलेले मांस वापरले जाते. याच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा झटका आणि कर्करोग (Cancer) होऊ शकतो.

 

बेक केलेल्या पदार्थांमध्ये बटर आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल वाढते.
या गोष्टींमध्ये भरपूर एलडीएल असते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होते.

 

आरोग्य तज्ञ जंक फूड टाळण्याचा सल्ला देतात. पण अनेकांना जंक फूड्स खूप आवडतात.
पण जंक फूड खाणे आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. जंक फूड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह,
हृदयविकार, लठ्ठपणा असे अनेक आजार होऊ शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Cholesterol | these foods raise cholesterol how to reduce ldl bad cholesterol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या भावावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

Poor Eyesight | चष्मा लावण्याची येणार नाही वेळ, अवलंबा ‘हे’ 5 रामबाण उपाय; अनेक समस्यांपासून मिळेल आराम

Potassium Rich Foods | पोटेशियमच्या कमतरतेमुळे येऊ शकतो थकवा आणि कमजोरी, आजपासून खायला सुरूवात करा ‘हे’ 5 फूड्स