यु.पी.एस. मदान नवे राज्य निवडणुक आयुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी मुख्य सचिव यु.पी.एस. मदान हे नवे राज्य निवडणुक आयुक्त असणार आहेत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने त्यांच्या नेमणूकीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
१९८३ च्या बॅचचे मदान यांची मार्च २०१९ मध्ये राज्याचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ते ऑक्टोंबर २०१९ मध्ये निवृत्त होणार होते. मात्र, मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दोनच महिन्यांनी मे मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. तेव्हाच त्यांची राज्य निवडणुक आयुक्तपदी नेमणूक करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

सध्याचे राज्य निवडणुक आयुक्त जी. एस. सहारिया यांची पाच वर्षाची मुदत ४ सप्टेंबर रोजी संपत आहे.
गेल्या महिन्यातच मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून बलदेव सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. या उपसमितीने मदान यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्याचा आदेश लवकरच निघणार आहे.

मदान यांची मार्च २०१९ रोजी मुख्य सचिव म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना मुख्य सचिव नेमता यावे यासाठी मदान यांनी मे मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्यांना मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून नेमणूकीचे आश्वासन देण्यात आले होते. स्वायत्त असलेल्या निवडणुक आयुक्तासारखे पद ५ वर्षे मिळत असल्याने मदान यांनी सेवानिवृत्तीपूर्वी ५ महिने आधी निवृत्ती घेतली.

आरोग्यविषयक वृत्त –