Madhav Bhandari | ‘परीक्षेच्या गोंधळाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपेंची न्यायालयीन चौकशी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Madhav Bhandari | आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत (Health department exams) राज्यात गोंधळ उडाला. यामुळे विद्यार्थ्यांची गडबड झाली. या पार्श्वभुमीवर आता भाजपने (BJP) राज्यातील सरकारला धारेवर धरले आहे. आरोग्य विभागाच्या 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेतील गोंधळाला न्यास कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका आरोग्य सेवा आयुक्तालयाने (Commissionerate of Health Services) ठेवला आहे. या कंपनीलाच परीक्षा घेण्याचे कंत्राट देणाऱ्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची न्यायालयीन चौकशी (Judicial inquiry) करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी केलीय.

 

माधव भंडारी (Madhav Bhandari) म्हणाले की, 24 ऑक्टोबर रोजी झालेली ‘क’ वर्गाची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. व 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वर्ग ‘ड’ च्या विविध पदांच्या परीक्षा घेण्याचे काम न्यास कडून काढून घ्यावे असं देखील ते म्हणाले. न्यास कंपनीलाच परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हेच आग्रही होते.
याच कंपनीला हे कंत्राट मिळावे यासाठी 21 वेळा निविदा मागविल्या गेल्या आहेत. हा अट्टाहास केवळ न्यासाला कंत्राट देण्यासाठीच केला गेला.
या कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेत तीनदा गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
एवढा घोळ घालणाऱ्या न्यासा कंपनीलाच कंत्राट देण्याच्या आरोग्यमंत्री टोपे यांच्या निर्णयाचा ‘अर्थ’ विद्यार्थ्यांना व जनतेला कळू लागल्याने टोपे यांची न्यायालयीन चौकशी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, परीक्षेवेळी अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नसल्याचे उघड झाले.
उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या.
आरोग्य विभागाच्या गट ड साठी रविवार 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी वितरीत करण्यात आलेले प्रवेश पत्र ग्राह्य न धरण्याचे संदेश विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत.
या कंपनीच्या घोळामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीही सरकारवर ओढविली होती.
एवढे होऊनही आरोग्यमंत्र्यांकडून ‘न्यासा’ लाच परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यासाठी आग्रह धरला जातो हे धक्कादायक आहे. असं देखील भाजपाने म्हटलं आहे.

 

Web Title : Madhav Bhandari | inquire health minister rajesh topes confusion over exams bjp demand Madhav Bhandari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | गणेश बिडकर यांचा जगताप यांच्यावर ‘हल्लाबोल’; सभागृह नेते म्हणाले – ‘प्रशांत जगताप यांना तुरूंगाची हवा खावून आलेल्या नेत्यांकडून कोणता सत्संग घडतो’ (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार बनले ‘डॉक्टर’, सन्मान समर्पित केला देशातील शेतकर्‍यांना

Pune Crime | एम.जी एन्टरप्रायजेस कडून गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक, सोमजी दाम्पत्यावर FIR