Pune Corporation | गणेश बिडकर यांचा जगताप यांच्यावर ‘हल्लाबोल’; सभागृह नेते म्हणाले – ‘प्रशांत जगताप यांना तुरूंगाची हवा खावून आलेल्या नेत्यांकडून कोणता सत्संग घडतो’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या (NCP) शहरअध्यक्षाने भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप करणे, हा या शतकातील महान विनोद आहे. कोरोनामुळे अनेकांवर मानसिक ताण आलेला आहे, परंतु तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांच्यावर अधिकच आलेला आहे. भाजपवर गुन्हेगारांना प्रवेश दिल्याचा आरोप करणार्‍या जगताप यांना ‘मोका कायद्यान्वये’ तुरूंगाची (MCOCA) Mokka हवा खावून आलेल्या शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन लोकप्रतिनिधींसोबत (Pune Corporation) कोणता सत्संग घडतो आहे? या शब्दात सभागृह नेते गणेश बिडकर (PMC house leader ganesh bidkar) यांनी जगताप यांचा समाचार घेतला.

 

प्रशांत जगताप यांनी काल पत्रकार परिषद घेउन भाजपचे प्रदेशअध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमांत तडीपार कुख्यात गुन्हेगारांची उपस्थितीचे फोटो पुरावे देत पाटील यांच्यावर पुण्याची संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप केला होता.
तसेच कोथरूड (Kothrud) येथे नुकतेच एका कार्यक्रमात जामिनावर असलेल्या गुन्हेगाराच्या पत्नीला पक्षात प्रवेश देण्याचा आरोपही केला होता.
यावरुन बिडकर यांनी जगताप यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शहर भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर (bjp spokesman sandeep khardekar) हे देखिल उपस्थित होते.

बिडकर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि गुन्हेगारी हे नाते जनतेला सांगायची गरज नाही. जगताप यांनी पक्ष व नेत्यांचा इहितास नजरेखालून घालावा नंतरच दुसर्‍यांवर आरोप करावेत.
पुण्याचाच विचार करायचा तर राष्ट्रवादीचे दोन विद्यमान लोकप्रतिनिधी (Pune Corporation) मोका कायद्याखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेले आहेत.
यातील एकाचे तर मार्गदर्शन सकाळ-संध्याकाळ जगताप घेत आहेत. त्यांना रोज बरोबर घेऊन फिरताना जगताप यांना कोणता संत्संग घडतो आहे, असा सवाल सभागृह नेते बिडकर यांनी विचारला आहे. जगताप यांच्या पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणानंतर फरार आहेत.
त्यांच्याविषयी जगतापांना काहीच बोलायचे नाही का? आपला पक्ष जनतेच्या मनातील सर्वात भ्रष्ट, गुंडांचा अशी प्रतिमा असताना जगताप जेव्हा संस्कृतीच्या गोष्टी करतात.
तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करावेसे (Pune Corporation) वाटते.

चंद्रकांत पाटील यांनी आमदारकीची दोन वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने सदिच्छा द्यायला आल्याबरोबर त्या महिलांच्या बदनामीची मोहीम जगताप उघडतात.
हे त्यांच्यातील पोकळ समतावादी दृष्टिकोनाचे दर्शन आहे. या महिलांचे भाऊ, पती काय करतात यावरून त्यांना बदनाम करणे, हा त्या महिलांवर अन्याय आहे.
भाजपने कोणत्याही गुन्हेगाराला पक्षात प्रवेश दिलेला नाही.
पक्ष प्रवेश देण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीमध्ये घेतला जातो. कार्यक्रमांना न बोलवता विविध क्षेत्रातील नागरिक येत असतात.
त्या प्रत्येकाची माहिती ठेवणे शक्य नसते.
जगताप यांनी ज्या गुन्हेगारांचा उल्लेख केला आहे, ते भाजपचे सदस्य नाहीत.
परंतू ज्या कोणी भाजपचा सदस्य असे सांगून पक्षाचे बॅनर लावले असतील.
यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे बिडकर आणि खर्डेकर यांनी नमुद केले.

 

Web Title : Pune Corporation | Ganesh Bidkar attack on ncp city president prashant jagtap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; 1 लाख 25 हजार रुपये मिळणार पगार

Pune Crime | एम.जी एन्टरप्रायजेस कडून गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक, सोमजी दाम्पत्यावर FIR

Jalgaon News | दुर्देवी ! खेळताना उकळत्‍या दुधात पडून दिड वर्षाच्या बालकाचा मृत्यू