‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमन सोबत न्यूड पोज देणं ‘या’ अभिनेत्रीला ‘भोवलं’ ! १४ वर्ष सुरु होता कोर्टात खटला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १९९२ साली मिस इंडियाचा किताब जिंकणारी मधु सप्रेने १४ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला होता. मधु सप्रेचा जन्म १४ जुलै १९७१ रोजी नागपूरमध्ये झाला. मधुन सप्रेने एका जाहिरातीसाठी न्यूड पोज दिली होती.
Madhu Sapre

मधु सप्रेने मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्स कॉन्टेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. हा किताब जिंकणारी ती प्रबळ दावेदार होती. परंतु शेवटच्या राऊंडमध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायला तिला जमलं नाही. यामुळे ती सेकंड रनरअप ठरली होती.
Madhu Sapre

मधु सप्रेने १९९५ साली आपला बॉयफ्रेंड मिलिंद सोमन सोबत टफ शुजच्या जाहिरातीसाठी न्यूड पोज दिली होती. यावेळी दोघांनी फक्त शुज घातले होते. यावेळी दोघांनीही आपल्या अंगावर अजगर गुंडाळला होता.
Madhu Sapre

मधु आणि मिलिंद सोमन यांच्याविरुद्ध लीगल नोटीसही पाठवण्यात आली होती. या जाहिरातीत अजगराचा वापर करण्यात आला होता. दोघांविरोधात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनकडून कोर्ट केसही दाखल करण्यात आली होती.
Madhu Sapre

मधु आणि मिलिंद यांना २००९ साली या केसमधून बरी करण्यात आलं. मधु सप्रेने बूम नावाच्या एकाच सिनेमात काम केले होते. हा सिनेमा कॅटरीना कैफचाही डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात अनेक बोल्ड सीनही होते.
Madhu Sapre

मधु सप्रेने बिजनेसमन जिआन मारियासोबत २००१ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघेही इटलीत सेटल झाले. २०१२ साली मधुने इंदिरा नावाच्या मुलीला जन्म दिला होता. सध्या मधु इटलीतच वास्तव्यास आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like