Madhuri Dixit | ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटासाठी माधुरीने घेतले होते तब्बल येवढे मानधन; ‘सलमानपेक्षा जास्त माधुरीला…’

पोलीसनामा ऑनलाइन – Madhuri Dixit | फॅमिली ड्रामा आणि तेही कोणत्या विलन शिवाय असा विषय आला तर सगळ्यांच्या तोंडात ‘हम आपके हैं कौन’ (Hum Aapke Hain Koun) या चित्रपटाचे नाव येते. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 29 वर्षे होऊन गेली आहेत तरी या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. दिग्दर्शक सूरज बडजात्या (Director Suraj Barjatya) यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील गाणी आजच्या पिढीलाही तोंडपाठ आहेत. सूरज बडजात्या यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’ (Hum Saath Saath Hai), ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) असे सुपरहिट चित्रपट बॉलीवुडला (Bollywood) दिले. (Madhuri Dixit)

यामधील ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या (Salman And Madhuri) जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. तसेच या चित्रपटातील इतर कलाकार अनुपम खेर(Anupam Kher), रीमा लागू (Reema Lagu), मोहनीश बहल (Mohnish Bahl), रेणुका शहाणे (Renuka Shahane), आलोक नाथ (Alok Nath) यांच्या देखील भूमिका देखील खूप गाजल्या होत्या. या मल्टीस्टारर चित्रपटाशी संबंधीत अनेक किस्से आहेत, जे चाहत्यांना जाणून घेण्याची आजही इच्छा आहे. यापैकी एका किस्सा माधुरी दीक्षितच्या मानधनाबाबतीत आहे. या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी हिने त्या काळात अभिनेत्यापेक्षा अधिक मानधन घेतले होते.

दरम्यान अनुपम खेर यांनी एका चॅट शोमध्ये माधुरीला या चित्रपटात काम करण्यासाठी तिला सलमानपेक्षा जास्त मानधन देण्यात आले आहे का, असा प्रश्न विचारला होता. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुपम खेर माधुरीला विचारत आहे “मी अस ऐकले आहे की, तुला हम आपके है कौन मध्ये सलमान खान पेक्षा जास्त पैसे मिळाले होते?” हे ऐकून माधुरी हसली, अनुपम खेर यांच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर न देता ती म्हणाली की “ही चर्चा सुरू झाली असेल, तर सुरु राहू द्या.”

माधुरीचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. तिची आणि सलमान खानची जोडी तसेच तिची आणि अनिल कपूरची जोडी (Madhuri And Anil Kapoor) बॉक्स ऑफिसवर हिट ठरत होती.
माधुरी त्या काळी यशाच्या शिखरावर असलेली एक टॉपची हिरोईन होती.
माधुरीने गाजवलेल्या त्या काळात हिरोपेक्षाही अधिक मानधन घेतले आहे.
माधुरीने हम आपके है कोन या चित्रपटासाठी 2.7 कोटी रूपये मानधन घेतले होते.
त्यावेळी एका अभिनेत्रीला मिळालेले हे सगळ्यात जास्त मानधन होतं.
या चित्रपटातील तिची भूमिका अजरामर राहिली आहे.
1994 सालचा सर्वात हिट चित्रपट असलेल्या या चित्रपटात माधुरीच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केले होते.
एकूण 13 गाणी असलेल्या या चित्रपटात माधुरीच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना बघायला मिळाली.
चित्रपटासाठी माधुरीला 1995 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) तर
दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award 1995)
मिळाला आहे. आजच्या पिढीलाही ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाची क्रेझ आहे.

Web Title : Madhuri Dixit | did madhuri dixit get more money than salman khan in hum aapke hain koun

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ