अन् पहिल्याच पावसात पूल गेला वाहून….

शिवपुरी : वृत्तसंस्था

मध्यप्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील कुनो नदीवर चक्क कोट्यावधी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याचे समजते आहे. यापूर्वी पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. या पूलासाठी जवळपास ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मध्यपरदेश सरकारचा आनॊगोडी कारभार पुन्हा आला आहे.

विशेष म्हणजे, ७ कोटी खर्च करण्यात आलेल्या या पुलाचे उद्धाटन तीन महिन्यापूर्वी एका केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले होते. २९ मे २०१८ रोजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. दरम्यान, पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्यामुळे मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल चढविला आहे.

राजापूरमध्ये भीषण कार अपघात; पाचजण ठार

हा पूल खरवाया आणि इंदुर्खी गावांना जोडणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल बांधावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर हा पूल बांधण्यात आला. मात्र, तीन महिन्यातच हा पूल वाहून गेला. त्यामुळे या पूल बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f67abfbd-b5a9-11e8-b35e-6d24c06b1306′]