‘४ आण्याची मुर्गी अन् १२ आण्याचा मसाला’ ! २० रूपयांच्या चोरीचा खटला चालला ४१ वर्ष ; आरोपीला ४ महिन्यांचा तुरूंगवास, जाणून घ्या

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेरमध्ये झालेल्या २० रुपयांच्या चोरीचा खटला तब्बल ४१ वर्ष चालला आणि आता लोकन्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला आहे. १९७८ वर्षातील हे चोरीचे प्रकरण आहे. बसचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या बाबुलाल यांच्या खिशातून इस्माईल खान यांनी २० रुपये चोरले होते. या प्रकरणी बाबुलाल यांनी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली होती. पोलिसांच्या तपासानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. हे प्रकरण न्यायालयात दीर्घकाळ चालू राहिले. आरोपी इस्माईल खानने न्यायालयात जाणेच सोडून दिले. यानंतर न्यायालयाने २००४ मध्ये इस्माईल खानला अटक करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी १५ वर्षानंतर इस्माईल खानला शोधून काढले आणि त्याला अटक केली. इस्माईल खानला ४ महिने तुरुंगात रहावे लागले. हे प्रकरण गेल्या शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालयात पोहचले. या ठिकाणी प्रथम वर्गीय न्यायदंडाधिकारी अनिल कुमार यांनी हा खटला निकालात काढला. न्यायालायने बाबुलालला सांगितले, हे प्रकरण ४१ वर्ष जुने आहे. आरोपीसुद्धा ४ महिने तुरुंगात राहिला आहे. हा खटला पुढे चालवण्याला काही अर्थ नाही. सुनावणी दरम्यान ६४ वर्षीय बाबुलालने म्हटले की, मी आरोपीला आता ओळखत नाही. हे प्रकरण आता येथेच थांबवा. यानंतर हे प्रकरण कायमचे थांबविण्यात आले.

ज्या पोलीस स्थानकात हे प्रकरण दाखल करण्यात आले होते, त्या पोलीस ठाण्यात देखील या प्रकरणाविषयी जास्त माहिती नाही. सरकारी वकील ऋषिकेश मिश्राने हे प्रकरण लोक न्यायालयात घेऊन जाण्याची सूचना केली. लोक न्यायालयात एकमेकांच्या संमतीने या प्रकरणाला पूर्ण विराम देण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे