Maggi, Coffee And Tea Price Increased | मॅगी, कॉफी आणि चहा महागला ! 9 ते 16 टक्केपर्यंत वाढली किंमत, जाणून घ्या नवीन प्राईस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maggi, Coffee And Tea Price Increased | मॅगी, चहा, कॉफी महाग झाली आहे. नेस्ले (Nestle) ने मॅगी (Maggi) आणि कॉफी (Coffee) उत्पादनांच्या किमती 9 ते 12 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यासोबतच हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever – HUL) ने सुद्धा आपल्या चहा आणि कॉफीच्या किमती वाढवल्या आहेत. नेस्ले आणि एचयूएलच्या किमती वाढल्यानंतर इतर एफएमजीसी (FMGC) कंपन्याही आगामी काळात त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात (Maggi, Coffee And Tea Price Increased). त्यामुळे आगामी काळात महागाई (inflation) चा आणखी भार सर्वसामान्यांवर पडणार आहे (Maggi, tea and coffee have become expensive).

 

मॅगी इतक्या रूपयांनी महागली (Maggie has become so expensive)

नेस्ले इंडियाने मॅगीच्या किमती 9 ते 12 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. आतापर्यंत 70 ग्रॅम मॅगी मसाला नुडल 12 रुपयांना मिळत होते, त्यासाठी ग्राहकाला आता 14 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचवेळी, मॅगीच्या 140 ग्रॅम पॅकेटची किंमत 12.5 टक्क्यांनी वाढवून 22 रुपयांवरून 25 रुपये केली आहे. याशिवाय मॅगीच्या 560 ग्रॅम पॅकेटची किंमत 9.6 टक्क्यांनी वाढवून 96 रुपयांवरून 105 रुपये करण्यात आली आहे.

 

नेस्लेची कॉफी महागली (Nestle’s coffee became expensive)

नेस्ले इंडियाने ए+ दुधाच्या कार्टनच्या किमतीत 4 टक्क्यांनी वाढ केली आहे.
पूर्वी त्याची किंमत 75 रुपये होती, जी आता 78 रुपये झाली आहे.
त्याच वेळी, नेस्ले क्लासिक कॉफी पावडरच्या किंमतीत 3 ते 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे,
ज्यामध्ये 2.5 ग्रॅम पॅकची किंमत पूर्वी 78 रुपये होती, ती आता 80 रुपये करण्यात आली आहे. (Maggi, Coffee And Tea Price Increased)

दुसरीकडे, नेस्लेने क्लासिक कॉफीच्या 50 – ग्रॅम पॅकच्या किंमतीत 3.4 टक्क्यांनी वाढ केली आहे,
ज्याची किंमत पूर्वी 145 रुपये होती, आता ती 150 रुपयांना उपलब्ध होईल.

 

HUL ने चहा – कॉफीच्या वाढवल्या किंमती (HUL increased the price of tea and coffee)

FMGC प्रॉडक्टची दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या चहा आणि कॉफी प्रॉडक्टच्या किमतीत वाढ केली आहे.
कंपनीने सर्व पॅकवर ब्रू गोल्ड कॉफीच्या किमतीत 3 ते 7 टक्क्यांनी वाढ केली आहे.
त्याच वेळी, ताजमहाल चहाच्या किमतीतही सर्व पॅकवर 3.7 – 5.8 टक्क्यांनी वाढ केली आहे.

याशिवाय, HUL ने चहाचा दुसरा ब्रँड, ब्रुक बाँड 3 रोझेस व्हेरिएंटमधील चहापत्तीच्या किमती सर्व पॅकमध्ये 1.5 – 14 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
एचयूएलच्या म्हणण्यानुसार, चहा – कॉफीच्या किमतीत ही वाढ कच्च्या मालाची किंमत आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे करण्यात आली आहे.

 

Web Title :- Maggi, Coffee And Tea Price Increased | maggi coffee and tea become expensive price increased by 9 to 16 percent

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा