Pune New Tehsil Office | पुण्यातील हवेली तालुक्याचे विभाजन करुन 2 तहसिलदार कार्यालय होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune New Tehsil Office | पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात (Haveli Taluka) 160 गावांचा समावेश असून अंदाजे 40 लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण (Urbanization) व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे (Administrative Work) लोणी काळभोर (Lonikalabhor) येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन (Pune New Tehsil Office) करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत (Legislative Assembly) सांगितले.

 

विधानसभेत सदस्य ॲड. अशोक पवार (Add. Ashok Pawar) आणि भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरिकीकरण (Civilization), विकास पाहता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली.

 

या लक्षवेधीस उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी –चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे अपर तहसिलदार कार्यालय (Pune New Tehsil Office) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय व अपर तहसिल कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे.

 

लोणी-काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे.
160 गावांमध्ये 46 तलाठी कार्यरत आहेत. 3165 तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी (Government Approval) दिली असून,
याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune New Tehsil Office | Haveli taluka in Pune will be divided into 2 tehsildar offices

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेच्या आत, सक्रिय रुग्णसंख्याही घटली; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

EPFO | PF खात्यावर व्याजापासून 7 लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स आणि कर्जासारख्या मिळतील अनेक सुविधा, जाणून घ्या

 

Nia Sharma Superbold Selfie | निया शर्माचा ‘हा’ सेल्फी पाहताच चाहत्यांना लागलं वेड, फोटोनं सोशल मीडियावर केला कहर